Breaking News

*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन*

*जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन*

*आजची महिला, स्त्री शक्ती व मातु्शक्ती विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन*


*विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा नागरि सत्कार*

नागपूर प्रतिनिधी- जोत्सना इंगळे

*नागपूर दिपस्तंभ फाऊंडेशन व्दारे गजानन सभागृह अमर नगर नागपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन दि.13 मार्च ला दुपारी 2-00 वाजता विविध क्षेत्रातील महिला समाजसेवींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. कांचनताईं गडकरी असुन त्यांनी आजच्या काळात मुलींनी स्वःताची काळजी अशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले.*


*कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ता अरुणाताई भोंडे,महिला पत्रकार ममता खांडेकर यांनी स्त्री शक्ती व मातु्शक्ती या विषयावर तर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता लेखीका व कवियत्री प्रा. विजयाताई मारोतराव यांनी बदलत्या काळातील महीला या विषयावर अपले मत व्यक्त केले*

*सदर आयोजनात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार, तसेच योग क्षेत्रात आपले अमुल्य योगदान प्रदान करूण नागपूर शहरा सोबतच संपूर्ण ििजिल्हा योगमय करणार्या उर्मिलाताई जुवारकर यांचा उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला तसेच वेशभूषा स्पर्धा व दिंडी इ. कार्यक्रम घेण्यात आले.*

*कार्यक्रमाचे संचालन श्रीमती शहाकाल यांनी तर प्रास्ताविक सौ वैशाली सुधाकर कोहळे यांनी व आभार प्रदर्शन सौ.उभाळे यांनी मानले*

*कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोत्सना इंगळे, सरोज जगताप, संध्या गुडधे, स्मिता वडाळकर, विद्या खडसे, वैशाली आगलावे आदिंनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने महिला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …