हिरापूर येथे महिला दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन

विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- हिरापूर ग्राम पंचायत व जि .प .शाळेचा पुढाकार. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरावदादा भोंगळे व नगराध्यक्ष सविताताई टेकाम यांची उपस्थिती. दिनांक 13 .3 .2020 रोज शुक्रवारला हिरापूर ता. कोरपना जि. चंद्रपूर येथे महिला दिनाच्या निमित्याने ग्राम पंचायत हिरापूर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापूर यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये जिल्हा परिषद शाळा हिरापूर यांचे वतीने महिलांचे विविध खेळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उदघाटन गडचांदूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सविताताई टेकाम या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हिरापूर ग्राम पंचायतीचे सरपंच प्रमोद कोडापे हे होते,सर्व शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधीकारी,मुख्यद्यापक,शिक्षक,व गावातील बहुसंख्य महिलांचा सहभाग व उपस्थिती होती. याचबरोबर हिरापूर ग्राम पंचायतीच्या वतीने w c l विरुर यांचे विद्यमाने आरोग्य निदान शिबिराचे आयोजन नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी केले. या शिबिरात 270 नागरिकांची तपासणी केली. तसेच हिरापूर येथील नागरिकांची रस्त्याची अडचण व जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पेव्हर ब्लाक बसविण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीने सरपंच प्रमोद कोडापे यांचे कडे सांगितले ही नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सरपंच प्रमोद कोडापे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.देवराव दादा भोंगळे यांच्या लक्ष्यात आणून दिली व देवराव दादा नि यासाठी निधी उपलब्ध करून दिला .यामध्ये सन 2019-2020 मध्ये हिरापूर गावाला येथे जिल्हा परिषदेच्या वतीने 👉1.जनसुविधा योजनेतून श्री.वसंता विधाते ते विशाल पावडे घरापर्यंत सिमेंट कांक्रेट रस्ता 3 लक्ष रु. 2. जनसुविधा योजनेअंतर्गत श्री.गिरजनाथ खणके ते देवराव पावडे यांचे घराकडे जाणारा कांक्रेट रस्ता.3 लक्ष रु. 3.जिल्हा परिषद शाळेच्या आवारात पेव्हर ब्लाक बसविणे.2 लक्ष रु . W c l मार्फत शिफारस करून. 4.नक्षलग्रस्त निधी योजनेअंतर्गत समशंनभूमी काक्रेट रस्ता 5 लक्ष रु. 5.जिल्हा परिषद शाळा सौन्दरयी करण व मोठी दुरुसाठी 4 लाख 50 हजार . 6. नवीन वर्गखोली मंजुरीच्या प्रतीक्षेत. 7. व जिल्हा परिषद शाळा वर्ग 1 ते 5 सेमी इंग्लिश च्या प्रतीक्षेत. वरील कामे जिल्हा परिषदेच्या वतीने हिरापूर येथे होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घघाटक श्री.देवराव दादा भोंगळे,माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर हे होते, या प्रसंगी हिरापूरचे सरपंच प्रमोद कोडापे,शिवाजी बोढे उपसरपंच, रवी आत्राम ग्रा प सदस्य ,शांताबाई टिपले ग्रा प सदस्य,ग्रामसेवक सुभाषाजी ताजने, गणपत पाटील काळे ,मुरलीधर बलकी माजी सरपंच, वाघमारे गुरूजी, मारोती पा .ठाकरे,दत्ता डाहुले ,अरुण काळे,गगाधर मडावी,विशाल पावडे, प्यारेलाल वाघमारे,भास्कर विधाते,सोमेश्वर जोगी,भगवान बोबडे, बशीर शेख ,सुनील पचाभाई,अर्जुन पंधरे, गणपत मडावी,अरुनजी देवतळे ठेकेदार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . आता लवकरच येत्या काही दिवसांमध्ये या कामाचे लोकार्पण व शिल्लक कामांचे भूमिपूजन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षा संध्याताई गुरूनूले आजी व माजी अध्यक्ष देवराव दादा भोंगळे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.असे मत सरपंच प्रमोद कोडापे यांनी याप्रसंगी व्यक्त केले
Maharashtra News Media सच की आवाज