Breaking News

नांदाफाटा परिसरातील अट्टल दारू तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या गडचांदूर उपविभागाच्या कार्यप्रणाली वर

नांदाफाटा परिसरातील अट्टल दारू तस्करांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या गडचांदूर उपविभागाच्या कार्यप्रणाली वर

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपनातालुक्यातील नांदाफाटा येथील अठ्ठल दारु तस्करांना बल्लारपूर जवळ पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आता यश आल्याने सविस्तर वृत्त असे की दिनांक १३ मार्च शुक्रवार ला रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की येनबोडी मानोरा येणारे ट्रक क्र. एम.एच.३४ बी.डी.४९३६ व एका विटारा ब्रिझा कार मध्ये अवैद्य रित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी हे बल्लारशाह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येनबोडी ते मानोरा मौजा भडकाम गावाजवळ रोडवर दवा धरून बसले होते काही वेळातच पथकास मिळालेल्या माहिती प्रमाणे विटारा ब्रिझा कार व एक मिनी ट्रक यांची पोलिसांनी झडती घेतली असता नमूद ट्रक मध्ये ५९ खरड्याच्या खोक्यात एकूण ५९०० नग ९० मिली नि भरलेल्या रॉकेट देशी दारूच्या शिशा एकूण किंमत ५,९०००० ,तसेच १८० मिली नी भरलेल्या ४८ नग देशी रॉकेट ९६०० तसेच दारू तस्करीकरीता वापरलेला अशोक लेलांड कंपनीचा १२१४ मॉडेल विटकरी रंगाचा मिनी ट्रक त्याची किंमत १५,००००० तसेच दारू वाहतुकीकरिता वापरलेली कठिया रंगाची मारुती विटारा ब्रिझा कार किंमत ७,००००० तसेच आरोपी कडून जप्त केलेले पाच मोबाईल ज्याची किंमत ३०,००० व नगदी ९५० रुपये असा एकून २८,३०,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी गौरव बंडीवार,नवीन पिरय्या मल्लारपू, मोईनीद्दीन सिद्दीकी ,सुरेश धनपाल मलेकोरवन या चारही नांदा फाटा येथील रहिवासी आरोपी विरुद्ध बल्लरशह पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक २६४/ २०२० कलम ६५ ( अ) ८३ महाराष्ट्र दारु बंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीना अटक करण्यात आले आहे पुढील तपास बल्लारशाह पोलीस करीत असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेशवर रेड्डी ,यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नर्तृत्वात त्यांच्या पथकाने केल्याने गडचांदूर व नांदा फाटा परिसरात चंद्रपूर जिल्हा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे नागरिकांडून कौतुक होत असून या तस्कराबद्दल गडचांदूर पोलीस व नांदा फाटा उपविभागीय कार्यालया पासून हाकेच्या अंतरावर दारू तस्कर व दारू विक्रेते रहिवासी असल्याने यांची स्थानिक पोलिसांना कल्पना नाही का की स्थानिक पोलिसांच्या रडारा बाहेर होते असे अनेक प्रश्न नागरीक उपस्थित करीत असून गडचांदूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …