Breaking News

*गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही संशयित किंवा बाधित रूग्ण नाही*

*गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा एकही संशयित किंवा बाधित रूग्ण नाही*


गडचिरोली प्रतिनिधी -सूरज कुकुडकर

गडचिरोली: जिल्हयात आजपर्यंत कोरोनाचा कोणीही संशयित रूग्ण अथवा कोरोना बाधीत व्यक्ती आढळून आलेली नाही, तसेच कोरोना बाबत जिल्हयात प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सूरू करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

.जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. जिल्हयातील सर्वच प्रशासनाची मदत घेऊन कामांचे वाटपही करण्यात आले आहे. पोलिस यंत्रणा परदेशी व्यक्ती, हॉटेलमध्ये आलेले बाहेरची व्यक्ती यांची माहिती घेणार आहे. तसेच पोलिस कोरोना बाबत सोशल मीडियावर अथवा अन्य मार्गाने अफवा पसरवणा-यांवर कारवाई करणार आहेत. गर्दीची ठिकाणांवरही प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे अशा कामांचा त्यामध्ये समावेश आहे. नागरीकांनी भीती न बाळगता कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनाकडून गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात स्वतंत्र वॉर्ड विलगीकरणासाठी सुरू करण्यात आला आहे. तसेच अलगीकरणासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामीण ते जिल्हा पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. स्वतंत्र रूग्णवाहिकेची व्यवस्था, घरोघरी जाऊन संशयित व्यक्तीची तपासणी, ग्रामीण भागात शासकीय दवाखान्यात कोरोनाबाबत विलगीकरणासाठी खाटांची व्यवस्था व या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करणे इत्यादी कामे आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहेत.अन्न व औषधी प्रशासनाला औषध विक्री, मास्क व सॅनिटायझर यांचा पुरवठा याबात तपासणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

नागरिकांनी कोरोनाबाबत भिती न बाळगता स्वच्छता राखणे व गर्दीची ठिकाणे टाळणे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.लोकांना काही शंका अथवा माहिती असल्यास गडचिरोली येथील सामान्य रूग्णालयात ०७१३२ २२२३४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रुडे यांनी केले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …