आस्था सहेली मंचच्या वतीने 8 मार्चला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन
विशेष प्रतिनिधि
रामटेक :-जागतिक महिला दिनानिमित्त आस्था सहेली मंच रामटेकच्या वतीने आंतर महाविद्यालयीन व कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांकरता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘स्त्री सक्षमीकरण व सुरक्षितता’या विषयावर 8 मार्च ला दुपारी 3.00 वाजता गांधी चौक रामटेक येथे आस्था सहेली मंचच्या वतीने आंतर महाविद्यालयीन तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ला प्रथम पारितोषिक 501रु, द्वितीय 301रु, तृतीय 201रु तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला 101 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन आस्था सहेली मंचच्या श्रीमती अनिता जयस्वाल,श्रीमती शीला शर्मा, डॉ.संगीता टक्कामोरे, श्रीमती रश्मी काठीकर,सौ मोनालिसा टक्कामोरे,नलिनी चौधरी, सौ पल्लवी जयस्वाल,सौ.आभा चौधरी, सौ नंदा मेंढे सौ.निधी टक्कामोरे, सौ कांचन देशमुख,सौ लता बोपचे,ईशा कुलकर्णी यांनी केले आहे .या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तसेच या कार्यक्रमाला सर्व महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे
Maharashtra News Media सच की आवाज