Breaking News

कोरपना नगरीत घनकचरा व्यवस्थापनाचा फज्जा ! मुख्याधिकारी गप्प कंत्राटदारांचे बल्ले बल्ले !

कोरपना नगरीत घनकचरा व्यवस्थापनाचा फज्जा !

मुख्याधिकारी गप्प कंत्राटदारांचे बल्ले बल्ले !

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना नगरपंचायत क्षेत्रात गेल्या तीन वर्षापासून एकाच कंत्राटदाराची मक्तेदारी आहे मात्र तो कंत्राटदार कोण हे गावकऱ्यांना व कामगारांना पत्ताच नाही करार नाम्या प्रमाणे घंटागाडी वाहतूक वाहन कचराकुंड्या अस्तावस्त पडल्या असून नगरपंचायतीच्या कामगारांचा वापर या कामासाठी केल्या जात आहे कराराप्रमाणे अंमलबजावणी होत नसल्याचे मुख्य अधिकारी यांच्याकडे यापूर्वी नगरसेवकांनी तक्रारी करून लक्ष वेधले मात्र मुख्य अधिकारी यांचे नियंत्रण असल्यामुळे व याबाबत आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग मुख्याधिकारी कधीच नगरात फेरफटका मारून आढावा घेतला नसल्याने नालीतून काढलेला गाळ घनकचरा सांडपाणी नियमित सफाई होत नाही व ज्या ठिकाणी गाळ काढून आहे ते पंधरा पंधरा दिवस उचल केल्या जात नाही अनेक नाल्या सांडपाणी व केअर कचऱ्यामुळे तुडुंब भरले असून यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला व गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे सध्या देशभरात कोरणा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन गंभीर असताना कोरपना नगरपंचायती मध्ये कामगारांचे शोषण घनकचरा वाहतुकीचे कामात दिरंगाई सफाई कामगारांची अल्पसंख्या सफाई कामाकडे दुर्लक्ष करा रामाच्या समजते पेक्षा कमी मजुरांचा वापर दैनिक कामाच्या नियोजनाचा अभाव नगरपंचायतीच्या अधिकारांचा नियंत्रण नसल्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा फज्जा उडाला आहे कंत्राटदार अटी व शर्तीचा भंग केला असून जबाबदारी पार पाडत नसताना व यापूर्वी कंत्राटदाराच्या कामाच्या दिरंगाई व मनमानी कारभाराच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी असताना नव्याने पुन्हा त्यात कंत्राटदाराला काम देण्यामागचे गुढ काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित करीत आहे गेल्या दोन वर्षात कामात गैरव्यवहार झाल्याच्या अनेक तक्रारी झाल्या पुन्हा मात्र ई-टेंडरिंग नियोजनबद्ध पद्धतीने तंत्राचा वापर करून त्यात कंत्राटदाराला देण्यामागे कारण काय नगरपंचायत पदाधिकारी अधिकारी यांच्या संगनमतातून घनकचरा व्यवस्थापन कामात दाल मे काला घडत असल्याचा गावकऱ्यांचा रोष आहे मुख्याधिकारी कंत्राटदारांच्या कारभाराची कर्तव्य म्हणून व जबाबदारी म्हणून आढावा घेतील काय असा सवाल नागरिकांनी केला असून गावामध्ये ठिकाणी केरकचरा नालीतील गड पडलेला असून अनेक वार्डातील नाल्या तुडूंब भरले आहे अनेक प्रभागांमध्ये कंत्राटदारांचे कामगार केलेच नाही तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामगारांना मानधन दिला जात नाहि व त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध झालेला नाही किमान वेतन कायद्याची पायमल्ली करत तुटपुंजे मानधन देऊन कामगारांचे कंत्राटदार शोषण करीत आहे राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा गोंडपिपरी गडचंदुर जिवती येथील नगर परिषद व नगरपंचायती नऊ ते बारा हजार रुपये पगार देत असताना कोरपणा येथे मात्र 3500 रुपये मानधन देऊन कामगाराच्या तोंडाला पाणी पुसल्या जात आहे याबाबत तातडीने दखल घेऊन नगर प्रशासन अधिकारी नगराच्या भोंगळ कारभारावर व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करतील का असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …