Breaking News

*झपाट्याने पणपत असलेल्या कोरोना वायरस विषयावर प्राथमिक आरोग्य केन्द्र उदासीन* *साफ सफाई चा फज्जा रुग्ण वाहिका बीमार* *आयसोलेशन कक्ष विषाणू प्रतिबंधीत कीट सोबतच मास्क चा तुटवडा* *संबंधित विभाग प्रमुख गैर हजर*

*झपाट्याने पणपत असलेल्या कोरोना वायरस विषयावर प्राथमिक आरोग्य केन्द्र उदासीन*

*साफ सफाई चा फज्जा रुग्ण वाहिका बीमार*

*आयसोलेशन कक्ष विषाणू प्रतिबंधीत कीट सोबतच मास्क चा तुटवडा*

 

 

*संबंधित विभाग प्रमुख गैर हजर*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत दिनेश चौरासिया, सावनेर
*सावनेरःः कोरोना वायरस संशीयितांची संख्या नागपूर जिल्ह्यात वाढत असुन संशयित रुग्णांचा आकडा 159 वर पोहचला असुन त्यातील चार रुग्ण कोरोना बाधित असल्याचे वु्त्त असुन संपूर्ण प्रशासन कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासकीय यंत्रणा युध्द स्तरावर कार्य करत आहे परंतू तालुक्यातील मोठे असे मानले जाणारे प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे यासंदर्भात कमालीची उदासीनता बघन्यात येत आहे*

*मागील कित्तेक दिवसापासून सर्वच शासकीय स्तरावरुन सदर कोरोना वायरसच्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता उपाय योजना आखण्यात येत असुन सदर आजारावर वरिष्ठ शासकीय अधिकारी यांची बारीक नजर आहे.वेळोवेळी मा.जिल्हाधिकारी नागपूर यांच्या सुचने नुसार सर्वत्र त्याची अमलबजावनी सुध्दा काटेकोर पणे होत आहे परंतू तालुका स्तरावरील मेडिकल हाँस्पिटल नागपूर च्या अधिनस्त कार्यरत सावनेर शहरातील प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे सहयोगी प्राध्यापक जन औषधवैकशास्त्र प्रमुख डॉ मेश्राम व स्वच्छता निरिक्षक शैलेश वाहाने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सावनेर ला वार्यावर सोडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे*

*प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहानी केली असता येथील प्रमुख प्रपाठक डॉ पवन मेश्राम स्वताःच कर्तव्यावर हजर नसून कोरोना वायरस चा प्रादुर्भाव टाळण्याकरिता घेण्यात येणार्या उपाययोजना, सतर्कता व सावधानीचे साधे फलक अथवा प्रसिद्धी पत्रक सुध्दा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येताच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधला स्वच्छता निरिक्षक शैलेश वाहाने यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षणकेंद्र (हेल्थ युनिट)सावनेर येथील साफ सफाई व देखरेखीत कमालीची उदासीनता आढळून आली*

*यात प्राथमिक आरोग्य केद्र सावनेर ची जुनी इमारत क्षतीग्रस्त झाल्याने त्याठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होत असल्याने जुया इमारतीतील सर्वच विभाग एकाच खोलीत ठेवल्याने तेथे रुग्णांची गर्दी होणे अपेक्षित आहेच अयात सदर वातावरण हे कोरोना सारख्या आजाराचे विषाणू झपाट्याने वाढविण्यासाठी पोषक ठरु शकते.सोबतच सदर हाँल मधेच महिला व पुरुष रुग्णांनातपासणी करण्यात करिता तात्पुर्ते खुले कक्ष अश्यात विशेषतः महिला रुग्णांना शरीराच्या विशिष्ट भागातील व्याधी दाखविण्यात मनस्ताप तर सहन करावा लागतच आहे असे विकार डाँक्टर ही कसे तपासणार…?,आरोग्य केंद्रात साफ सफाई चा फज्जाच उडाला असल्याचे दिसून येत असुन कोरोना वायरस चा प्रादुर्भाव टाळण्याकरिता अथवा रोकथाम करण्याकरिता सद्यातरी कोणतीही उपाययोजना आढळून आली नाही*

*संशयित कोरोना वायरस रुग्णांकरिता सर्व सुविधायुक्त आयसोलेशन कक्षा बाबत विचारणा केली असता प्रपाठक डॉ मेश्राम यांनी दि.16 मार्च रोजी स्वच्छता निरिक्षक शैलेश वाहाने यांना हेल्थ युनिट सेंटर येथे रिकाम्या असलेल्या एका कक्षाला सर्व सुविधा युक्त आयसोलेशन कक्षात रुपांतर करण्याकरिता सर्व उपाय योजना करण्याच्या तोंडी सुचना दिल्याची माहिती असुन तीन दिवस लोटून सुध्दा सदर निर्माणाधिन “आयसोलेशन”कक्ष बधन्याकरीता आमचे स्थिनीक प्रतिनिधी गेले असता चक्क पाया खालील जमीन हालुन आश्चर्याचा धक्काच बसला दाखविण्यात आलेले निर्माणाधिन आयसोलेशन कक्षात सर्वत्र धाणीचे साम्राज्य,धुळीने माखलेल्या भींती,भींतीवर कातीन मावशीची जाळे एका कोपर्यात चार पाच लोखंडी पलंग बघुन असे सुसज्य आयसोलेशन कक्ष बघुन कोरोना वायरसची लागन लागलेला रुग्ण तर सोडा चक्क कोरोना वायरस चा विषाणूच पळून जाणार अश्या दुरव्यवस्थेत सदर कक्ष असुन कक्षा समोरच ठिकठिकाणी उघड्यावर कचरा जाळण्याचे ढीगारे,मुख्य व्दारा सह ठिकठिकाणी कचर्याचे ढीगारे,प्रसाधन गु्हाची दयनीय स्थीती,पीण्याच्या पाण्या सोबतच वापरिच्या पाण्याचा पुरवठा करणार्या विहिरीची दशा न वर्तवलेलीच बरी,शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या ग्रामीण प्राथमिक प्रशिक्षण केन्द्राचे हे हाल असतील तर या अधिनस्त कार्यरत इतर ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राचे काय असा प्रश्न निर्माण होतो*

*तर सदर ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केन्द्राची रुग्णवाहीका “एँम्बुलेंस” मागील अनेक दिवसा पासुन नादुरुस्त अवस्थेत कुठे पडली आहे या संदर्भात माहिती मीळू शकली नाही तर एक MH 14 CL 0412 क्रमांकाची 108 रुग्ण वाहिका उभी दिसून आली परंतू त्यात फक्त एक चालक व्यतीरीक्त कोणीही डाँक्टर उपस्थित नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली तसे तर सदर 108 रुग्ण वाहिकेत चौवीस तास दोन चालक व दोन डाँक्टर असने बंधनकारक आहे जेव्हा आपल्या कार्यालयातच इतका सावळा गोंधळ आहे तर रुग्ण वाहिकेवर लक्ष कोण देणार*

*कोरोना वायरस सारख्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ही जर संबंधित आरोग्य विभाग प्रमुखांची आपल्या कर्तव्य दक्षतेला तिलांजली देऊण नागरिकांच्या जिवीतेशी खेळणार्या संबंधित आधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करुण दोषी आढळल्यास त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …