Breaking News

*कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण प्रशासन सज्ज* *संधीसाधू व काळा बाजार करणार्यांवर कठोर कारवाई केल्या जाणार*- (दिपक कारंडे तहसीलदार सावनेर)

*कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण प्रशासन सज्ज*

*शहरासह ग्रामीण भागातही संचारबंदी सदु्श*

*कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार ,कर्तव्य दिरंगाई व गैरप्राकार खपविल्या जाणार नाहीत*

*संधीसाधू व काळा बाजार करणार्यांवर कठोर कारवाई केल्या जाणार*

(दिपक कारंडे तहसीलदार सावनेर)

*प्रतिनिधी सुरज सेलकर सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेर जगभरात कोरोना वियरसने धुमाकूळ घातला आहे.याचा प्रादुर्भाव आपल्या देशातसुध्दा होत असल्याने भारत सरकार च्या वतीने राज्याराज्यातील सरकारांना या जागतिक महामारी पासून आपल्या देशवासीयांना सुरक्षित ठेवण्याचे आव्हान करण्यात येत आहे.याच अनुशंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात सुध्दा जिवनावशक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.त्या आदेशानुसार नागपूर ग्रामीण भागात ही याचा प्रभाव दिसून येत आहे*
*जिवघेणा कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रसार थांबवीण्या करिता तहसीलदार दिपक कारंडे यांनी आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन, नगर परिषद प्रशासन व संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे निर्गमीत सर्व उपाययोजनांचे काटेकोर पणे पालन करण्याच आदेश सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले असुन प्रशासनाकडून चालविण्यात येत असलेल्या उपाय योजनांना नागरिकांनकडून ही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसूनयेत आहे.*
*मा.जिल्हाधिकारी यांचे विशेष आदेशानुसार ग्रामीण भागातील शहर तसेच महामार्गावरिल बियर बर,ढाबे,हाँटेल,पान टपरी,चहा दुकाने बंद असल्याने गर्दीचे प्रमाणात कमतरता आली आहे*
*तर सावनेर पोलीस निरिक्षक अशोक कोळी सह खापा,केळवद,खापरखेडा असे तालुक्यातील सर्व पोलीस स्टेशन चे आधिकारी कर्मचारी धारा 144 अंंतर्गत जमावबंदीचे पालन करणयासाठी जन जागु्ती अभीयान राबवून नागरिकांना सतर्कतेचे आव्हान करत आहेत*
*तर सावनेर नगर पालिका व्दारे ध्वनीक्षेपावरुन जागरुकतेचे आव्हान व परिसरात औषधी चा शिरकाव करण्यात येत आहे.सध्या स्थितीत सावनेर तालुक्यासह इतर ग्रामीण भागात असे रुग्ण व अश्या रोगाचे लक्षण आढळले नसले तरी नागरिकांना प्रसार माध्यमातून या आजाराची भयावता माहीत झाल्याने नागरिक स्वतःह सतर्कता बळगत आहेत*
*कोरोना वायरस प्रादुर्भाव वाढताच औषधालयातून गुणवत्ता प्राप्त मास्क मीळत नसून कोणत्याही औषधालयात ते उपलब्ध नसल्याने त्याचा काळाबाजार होऊन दाम दुपट्टीने विकल्या जात आहेत तर गुणवत्ता हिन मास्क ठिक ठिकाणी उपलब्ध होत असुन तेही अनापशनाप दराने विकल्या जात आहेत तर काही दुकानदार नजर लपवून व्यवसाय करत असल्याचे ही महीती मीळत असल्याने व काही कर्मचारी अधिकारी आपल्या कर्तव्याशी न्याय न करता आपल्या जबाबदार्या एक दुसर्या वर ढकलून वेळकाढू पणा करीत असल्याचे ही बोलल्या जात असल्याची माहिती प्राप्त होत असल्याने तहसीलदार दिपक कारंडे यांनी आमचे स्थानिक प्रतिनिधीशी बोलतांना स्पष्ट केले की कामचुकारी करणारे अधिकारी कर्मचारी तसेच शासनाच्या आदेशाची पायमल्ली करुण काळाबाजिर करणार्यांवर कारवाई करण्यात येण्याचा इशारा प्रसार माध्यमाशीं बोलतांना दिला*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …