*मोहफुलाच्या च्या दारू भट्टीवर पोलिसांची धाड*

*सोळा लाख रुपयाचा दारूसाठा जप्त*

स्थानिक बीट इन्चार्ज यांच्या आशीर्वादाने सुरू होता हा अवैध व्यवसाय
कळमेश्वर प्रतिनिधी- मुशिर सैय्यद
*सावनेरः मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कळमेश्वर पोलिस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार जगदीश गायकवाड यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील माहूर झरी या गावात सुरू असलेल्या मोह मुलाच्या दारू भट्टीवर छापा टाकून 16 लक्ष फुलाची दारू व इतर साहित्य जप्त केले.*

*दिनांक 18 मार्च रोजी 5.00 ते 5.30 दरम्यान पोलिसांनी माउरझरी गावात सुरू असलेल्या दारू भट्टी वर छापा टाकन्यात आला सदर ठिकाणी प्लास्टिक सिंटेक्स टाक्या एकूण आठ हजार लिटर मोह फुलाची दारू प्रतिलिटर दोनशे रुपये प्रमाणे 16 लक्ष रुपये व आठ सिंटेक्स टाकी किंमत 2500 रुपये असा एकूण 1602500 रुपयाचा दारू साठा जप्त केला. व दहा लोखंडी काळे भट्टी गाळण्याचे ड्रम 200 लिटर क्षमतेचे एक प्रत्येकी किंमत 300रुपये एकूण किंमत 3000,आठ प्लास्टिकच्या डबके क्षमता 20 लिटर प्रत्येकी किंमत 200 रुपये एकूण 1600 रुपये, 5 जूने लोखंडी पिंपळा एकूण किंमत 500 रुपये, दारू काढण्याचे साहित्य एकूण 300 रुपये ,एक इलेक्ट्रिक मोटर व हिरव्या रंगात ची रबर पाईप एकूण किंमत 5900 असा एकूण 1625800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.*

*सदर कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक जय शर्मा,हवालदार मन्नान नौरंगाबादे व पोलीस हवालदार रवी यांनी केली या कारवाईदरम्यान आरोपी तुळशीराम वरघणे राहणार माहूरझरी फरार होण्यास यशस्वी झाला.*
*गेल्या अनेक दिवसापासून माउरझरी या गावात मोहफुलाच्या दारूची अवैध विक्री होत होती त्या हद्दीतील बीट इन्चार्ज देवेंद्र सोनावले आहे मात्र त्यांना या मोहफुलाच्या दारू विक्री बाबतची माहिती माहीत नव्हती का असा प्रश्न समोर निर्माण झाला आहे.बीट जमादार देवेंद्र सोनावले व दारू विक्रेते यांच्यासोबत मधुर संबंध असल्याची चर्चा असून त्यांच्या बीट मधील असलेल्या बहुतांश गावात अवैध देशी दारू,गावठी दारू विक्री होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. पोलीस कर्मचारी सोनवले हे आतापर्यंत ज्या ज्या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते त्या त्या ठिकाणी अवैध धंद्यांना उधाण आल्याची माहिती आहे तेव्हा सदर पोलीस कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.*

*सदर धाडी नंतर पोलिसांनी जेसीबी च्या सहाय्याने सदर मोहफुल सडवीन्या करिता वापरण्यात येत असलेल्या साहित्यासोबतच भट्टी लावण्याकरिता केलेले मोठे खड्डे भुईसपाट करण्यात आले असुन सदर अवैध दारु भट्टीच्या धाडीत प्रोफेक्स सुपर “किटनाशक फवारणी” ची 250 बाँटल मीळाल्याने आपल्या फायद्या करीता बिट जमदार व आरोपी यांनी लोकांच्या जिवीतेचा जनुकाही खेळच मांडल्याचे आढळून आले यावर तपास अधिकारी कोणती कारवाई करतात यावर नागरिकांचे लक्ष वेधले आहे*
Maharashtra News Media सच की आवाज