Breaking News

*शासनाच्या आदेशाला हुलकावणी देऊण भरला सावनेर आठवडी बाजार* *सावनेर नगर प्रशासनाच्या जाहीर सुचनेस वटान्याच्या अक्षदा*

*शासनाच्या आदेशाला हुलकावणी देऊण भरला बाजार*


*नगर प्रशासनाच्या जाहीर सुचनेस वटान्याच्या अक्षदा*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत दिनेश चौरासिया, सावनेर

*सावनेरः कोरोना वायरस चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हाधिकारी नागपूर यांनी ग्रामीण जनतेच्या सुरक्षितते करिता ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केलेले आहे त्या अनुशंगाने शुक्रवार रोजी सावनेर येथील आठवडी बाजार असतो त्यामुळे तीन दिवस आधीपासून नगर परिषद सावनेर व्दारे जाहीर दवंडी करुण आजचा बाजार भरणार नसल्याच्या सुचना आठवडी बाजारातील किरकोळ व्यवसाई,ठेलेवाले,फेरीवाले,फळवाले आदिंनी देण्यात इल्या होत्या*


*शुक्रवार दिवस उजळताच नगर प्रशासनाचे कर्मचारी शहराच्या मुख्य मार्गावर फीरून रस्त्यावर बसनार्या आठवडी बाजरातील दुकानदारांना दुकाने न लावन्याची वीनंती करत घाम गाळू लागले.परंतू जस जसा दिवस पुढे सरकत गेला तस तशी दुकानदारांची दुकाने थाटन्याची उत्सुकता तीव्र होऊ लागली व सायंकाळी 4-00च्या दरम्यान पीक अप व्हँन,टाटा एस,तीन चाकी पाच चाकी आटो,ट्रँक्टर ट्राल्या भाजीपाला भरुण रस्त्याच्या मधोमध उभे राहुन व भाजीमंडीत पोहचून उभ्या वाहनातुन व्यवसाय करु लागले व बघता बघता एकच गर्दी होऊण सदर ठिकाणास बाजाराचे स्वरुप प्राप्त होऊन नगर प्रशासनानी जन जागु्ती करीता केलेला दवंडी व प्रसिद्धी फलकावरील हजारोचा खर्च व सकाळपासून कर्यचार्यांनी केलेली पुर्ण मेहनत वाया गेली.*


*आठवडी बाजारात दुकानदार आपले दुकाने लावत असल्याची सुचना मुख्याधिकारी सावनेर यांना देऊण सुध्दा त्यांनी त्या सुचनानवर लक्ष न दील्यानेच सदर आठवडी बाजार ऊशीरा का होई ना आखेर भरलाच व जी गर्दी व्हायला नको होती ती गर्दी झालीच अश्यात सावनेर शहर व परिसरात कोरोना वायरस विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर व त्यांचे संबधित अधिनस्त कर्मचाऱ्यांना दोषी मानुन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे कारण की संपूर्ण देश कोरोना वायरस च्या प्रादुर्भावास रोकण्या करिता उपाययोजना करत आहे व हे साहेब आपल्या कर्तव्याला तिलांजली देत आहेत*


*शहरातील आठवडी बाजार हा तालुक्यातील मोठा आठवडी बाजर असून जवळपास च्या गावा वरुण गावकरी बाजारास येत असल्याउ बाजर करणार्यांची संख्या हजारोत असल्याने कोरोना वायरस प्रादुर्भाव वाढन्यास पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने नगरवासीयात भीतेचे वातावरण निर्माण होऊण राज्य शासन,जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाचे काटोकोर पणे पालन न करणारे रविन्द्र भेलवे मुख्याधिकारी सावनेर यांच्यावर तसेच संबंधित अधिकारी यांच्यावर आपल्या कर्तव्याचे पुर्ण पणे पालन न करणार्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी नागरिकांतुन होत आहे.*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …