Breaking News

*कोरोना वायरस बद्दल सावनेर तालुका मराठी पत्रकार संघा व्दारे जनजागृती मोहीम**22 मार्च रोजीच्या जनता कर्फ्यू ला सहकार्य करण्याचे नागरिकांना आव्हान*

*कोरोना वायरस बद्दल सावनेर तालुका मराठी पत्रकार संघा व्दारे जनजागृती मोहीम*


*किराणा,फळभाजी,औषधालये वगळता इतर व्यापारी बंधुना आपले प्रतिष्ठान बंद ठेवण्याची विनंती*


*नागरिकांना हात स्वच्छ धुन्याचे व स्वच्छता राखण्याचे आव्हान*

*अनावश्यक प्रवास व गर्दीचे ठीकाण टाळण्याची विनंती*

*22 मार्च रोजीच्या जनता कर्फ्यू ला सहकार्य करण्याचे नागरिकांना आव्हान*

*प्रतिनिधी सुरज सेलकर व दिनेश चौरसीया सावनेर*

*सावनेर ःसंपुर्ण विश्वाला हादरून सोडणारा कोरोना वायरस आपल्या देशात आता तीसर्या चरणात प्रवेश करत असून हे चरण अंत्यत महत्वाचे मानून या चरणात सुरक्षितता व सावधानी चे पाऊल उचलून शासनाच्या दिशानिर्देशा चे पालन केल्याने सदर कोरोना वायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासकीय स्तरावरुन भरपूर प्रयत्न होत असुन सुध्दा काही ठिकाणी “मला कोरोना होत नाही असा” असा गैरसमज जनसामान्यात आहे*
*शहरातील विशेषतः व नगरातील काही भागात इतर व्याफरी बंधूनी आपली प्रतिष्ठाने सुरु करुण व्यवयास करत असल्याने सावनेर तालुका पत्रकार संधाचे अध्यक्ष तेजसींग सावजी यांचे नेतृत्वात गडकरी चौक,बाजार चौक,मडकी चौक,जयस्वाल मार्केट,होळी चौक,असे भ्रमण करीत व्यापारी बांधवा सोबतच नागरिकांना शासन स्तरावर सुरु असलेल्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली पत्रकार संघाच्या विनंतीला मान देत औषधालय,कीराणा स्टोर्स,फळभाजीचे दुकान वगळता सर्व व्यापारी जागरुकता आहे परंतु स्वच्छतेविषयीची माहीती ,सेनेटायझर,डेटाल व इतर द्रव्यांनेच हात धुणे,मास्क वापरने,दुकानावर जास्त गर्दी होऊ न देने तसेच राज्य व केन्द्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय,नगर प्रशासन,आरोग्य विभाग आदी कडून निर्गमीत जनजागृती सुचना नागरिकांन पर्यत पोहचविन्याचे उत्सफुर्त कार्य केल्या जात आहे*
*सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी एक एक दोन दोन अश्या टोळ्या निर्माण करुण सुरक्षित अंतर ठेवून दि.22 मार्च ला केन्द्र शासनाचे “जनता कर्फ्यू” बद्दल माहीती देत किमान एक दिवस तरी आपण आपल्या घरी राहून शासनास सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली*
*याप्रसंगी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसिंग सावजी,कार्याध्यक्ष किशोर ढुंढेले,सचिव योगेश पाटील, उपाध्यक्ष दिपक कटारे,कोषाध्यक्ष नीलेश पटे,जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत दिवटे,विजय पांडे,पियुष झींजुवाडीया,पाडुरंग भोंगाडे,रितेश पाटील, स्क्रिंन मिडीया प्रतिनिधी रवी काळबांडे,सुरज सेलकर,दिनेश चौरसीया,मुकेश झरबडे,समाजसेवी व माजी नगर सेवक रामभाऊ उमाटे,रामेश्वर रुषीया इत्यादीने प्रामुख्याने उपस्थीत राहुन या जनजागृती मोहीमेत भाग घेतला*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …