*जनता कर्फ्यूस सावनेरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद*

*सावनेर कडेकोट बंद नगर प्रशासनाने संपूर्ण नगरीची केली किटनाशक फवारणी*

*तहसीलदार, ठाणेदार,मुख्याधिकारी सह संपूर्ण प्रशासकीय यंत्राणा रस्त्यावर*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर व दिनेश चौरसीया*
*सावनेरः सावनेर शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात आज सकाळ पासूनच जनता कर्फ्यू बद्दल जागु्कता दिसून येत असुन देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या आव्हानास नागरिक स्वयःफुर्तीने सहयोग करत अहल्याचे निदर्शनास येत आहे*

*आज दि.22 मार्च ला सकाळ 7-00 वाजता पासुन “जनता कर्फ्यू” ला सुरुवात झाली त्या अनुशंगाने संपूर्ण शासकीय यंत्रणा आधीपासुनच सज्ज असल्याने सावनेर पोलीस स्टेशन निरिक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण पोलीस प्रशासन तर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविन्द्र भेलवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासन आपल्या कर्तव्यावर हजर असून रस्त्यावर अतीआवश्यक कार्याकरीता निघनार नागरिकांना समजुत घालुन त्यांआ परत जाण्याकरिता विनंती करत होते.8-00,8-30 च्या दरम्यान नगरातील कोणीही नागरिक मुख्य रस्ते तर सोडा गल्ली बोळीत सुध्दा नजर येत नसल्याने नगरीत पुर्ण पने शुकशुकाट असुन सदर जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे*

*सकाळी 9-00चे दरम्यान सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे व स्क्रिन मीडिया चे पदाधिकारी वु्त्त संकलना करीता बाहेर पडले असता दिपक कारंडे तहसीलदार सावनेर हे आपल्या आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचार्यांच्या सोबत नगरिच्या मुख्य मार्गाने परिस्थितीवर करडी नजर ठेवून गस्तीव असुन सावनेर पोलीसांनी गांधी पुतळा,नाग मंदिर, शिव मंदिर,शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केन्द्र,पांढुर्ना रोड इत्यादी ठीकाणी नाकेबंदी तसेच शासकीय वाहनांने संपूर्ण नगर भ्रमण करीत घरा दारा पुढे असलेल्या एकट दुकट नागरिकांना विनंती करुण घरात राहण्याची सुचना देत तर नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे हे आपले अधिनस्त अधिकारी कर्मचारी दिनेश बुधे,निशांत धुर्वे,अनिल गोवर्धन,पंकज छेनुया,धिरज देशमुख,योगेश वानखेडे,सुरज ढोके,विलास डोंगरे, जितू जिवतोडे,शामसुंदर समुद्रे आदी कर्मचारी सोबत शहरातील मुख्य रस्ते, वर्दळीचे ठीकाण, बस स्थानक आदी परिसरात किटनाशक फवारणी करुण संपूर्ण शहर कोरोना वायरस च्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करित असुन प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे डाँ भुषन सेंबेकर,डॉ छेनीया सह इतर कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असुन कोणत्याही अप्रिय घटनेला तोंड देण्यास सज्ज तर महाराष्ट्र राज्य परिवन विभागातील सावनेर आगारातही चालक,वाहक व तांत्रिक विभागातील कर्मचारी गरज भासल्यास “आम्ही तयार आहो” चा जणुकाही संदेश देत असल्याने संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पुर्ण पणे सज्ज असल्याचे व जागतिक महामारीचे स्वरूपघेऊ पाहणार्या कोरोना वायरस चा हा तिसऱ्या चरणातील प्रादुर्भाव टाळण्याची जिद्द संपूर्ण प्रशासकीय यंत्रणे सोबतच नागरिकांमधे दिसुन आली*

*आमचे स्थानिक प्रतिनिधिने दिपक कारंडे तहसीलदार सावनेर यांच्याशी संवाद साधून त्यांचे मत जाणूनघेतले असता त्यांनी सांगितले की की कही मोके अती आवश्यक प्रसंग वगळता कोणही नागरिक रस्त्यावर दिसत नसल्याने तसेच पोलीस विभाग व नगर प्रशासना सोबतच तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचार्यांच्या सहकार्याने आजचे जनता कर्फ्यू आपल्या भागात पुर्ण पने यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे आज रात्री 9-00 पर्यंत सर्व नागरिक सहकार्य करतील अशी तहसीलदार या नात्याने मी आशा बाळतो व नागरिकांना विनंती करत त्यांचे आभार मानतो की आपन या राष्ट्रीय आपदे मधे सुजान नागरिक म्हणून व कोरोना वायरसचे प्रादुर्भाव टाळने हे आपले कर्तव्य समजून करत आहात नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास आपण कोरोना वायरस च्या विषाणूस नक्कीच पराभूत करु असे ठाम मत व्यक्त केले*

*तर सावनेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी सांगितले की सदर जनता कर्फ्यू करिता आम्ही पुर्व तयारी करुण आधिच सर्व अधिकारी कर्मचारी यांना त्यांचे काल्यक्षेत्र व फीक्स पाँइट वाटुन दिल्याने सर्व कर्मचारी अधिकारी सकाळी 6-00 वाजता पासूनच आपल्या कर्तव्यावर रवाना होऊण शहर व शहराबाहेरुन येणारे वाहन,नागरिकांना विनंती करुण त्यांना परत पाठवून सोबतच शासकीय वाहानासोबतच इतर खाजगी वाहनाव्दारे सततची गस्त संपूर्ण सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत सुरु आहे व नागरिक तसेच पत्रकार बांधव व सामाजिक संस्था आदिंचे सहकार्य आम्हाला मिळत असल्याचे व मा.पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नागरिकांना केलेल्या जनता कर्फ्यूच्या आव्हानाचे नागरिक शतप्रतिशत पालन करुण आप-आपल्या घरीच असल्याने संपूर्ण रस्त्यावर ओस पडून सुनसान असल्याने आजचा राष्ट्रीय बंद सफल होत असल्याचे दिसून येत असल्याचा विश्वास व्यक्त केला*

*कु.पुजा च्या जागरूकतेस नमन*
*पुजा ही आपल्याच शहरातील मुलगी असुन ती शिक्षणाकरिता पुण्याला असते आज पहाटे 5-00च्या दरम्यान ती पुण्यावरुण सावनेर ला आपल्या परिवारात परतली आपण पुण्यावरूण सावनेर पर्यंतचा प्रवास केला आहे प्रवासात आपल्याला कोरोना वायरस विषाणूंचा प्रादुर्भाव तर झाला नाही ना म्हणून जनता कर्फ्यू सुरु असतांना देखील तीता आपली ,आपल्या परिवारा सोबतच आपल्या शहराची काळजी तीच्या मनात होती म्हणूनच जनता कर्फ्यू सुरु असतांना ही तीने आपल्या वडीलांन कडे हट्ट करुण की मला स्वतःरा तपासून घ्यायचे आहे व त्याकरीता ती आपल्या वडीलांन सोबत प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे येऊण तीने आपली प्रलास हिस्ट्री सांगितली असता डॉ. भुषन सेंबेकर व डॉ छेनीया हीने तीची कोरोना वायरस विषाणू सर्संगजन्य व्याधी संबंधित लक्षणा बद्दल तीला विचारपुस करुण ती पुर्ण पणे स्वस्थ असल्याची माहीती घेऊण पुजा आपल्या वडीलांना सोबत आपल्या घरी रवाना झाली.आपल्या कर्तव्यदक्षता व सामाजिक बांधलकी जपन्याकरिता पुढे येणार्या पुजाला महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फे मानाचा मुजरा “वेलडन पुजा”….*
Maharashtra News Media सच की आवाज