Breaking News

*जनता कर्फ्यूस सावनेरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद* *सायंकाळी पाच वाजताच ताट,गडवा,भांडी कुंडी सोबतच मंदिरात शंखनाद,टाळमु्दंगाच नाद…* *कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा टाळ्या वाजवून शेवटी आम्हीही आपल्यालेच चा दिला परिचय*

*जनता कर्फ्यूस सावनेरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद*

*सायंकाळी पाच वाजताच ताट,गडवा,भांडी कुंडी सोबतच मंदिरात शंखनाद,टाळमु्दंगाच नाद…*

 

*कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचारी यांनी सुध्दा टाळ्या वाजवून शेवटी आम्हीही आपल्यालेच चा दिला परिचय*

*तहसीलदार, ठाणेदार,मुख्याधिकारी सह संपूर्ण प्रशासकीय यंत्राणा रस्त्यावर*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनी सुरज सेलकर व दिनेश चौरसीया सावनेर*

*सावनेरः सावनेर शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात आज सकाळ पासूनच जनता कर्फ्यू बद्दल जागु्कता दिसून येत असुन देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या आव्हानास नागरिक स्वयःफुर्तीने सहयोग करत अहल्याचे निदर्शनास येत आहे*


*दि.22 मार्च ला सकाळ 7-00 वाजता पासुन “जनता कर्फ्यू” ला सुरुवात झाली त्या अनुशंगाने संपूर्ण शासकीय यंत्रणा आधीपासुनच सज्ज असल्याने सावनेर पोलीस स्टेशन निरिक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली संपुर्ण पोलीस प्रशासन तर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविन्द्र भेलवे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासन आपल्या कर्तव्यावर हजर असून रस्त्यावर अतीआवश्यक कार्याकरीता निघनार नागरिकांना समजुत घालुन नगरातील कोणीही नागरिक मुख्य रस्ते तर सोडा गल्ली बोळीत सुध्दा नजर येत नसल्याने नगरीत पुर्ण पने शुकशुकाट असुन सदर जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे*

*तहसीलदार दिपक कारंडे आपल्या अधिनस्त अधिकारी कर्मचार्यांच्या सोबत नगरिच्या मुख्य मार्गाने परिस्थितीवर करडी नजर ठेवून गस्तीव असुन सावनेर पोलीसांनी गांधी पुतळा,नाग मंदिर, शिव मंदिर,शासकीय औद्योगीक प्रशिक्षण केन्द्र,पांढुर्ना रोड इत्यादी ठीकाणी नाकेबंदी तसेच शासकीय वाहनांने संपूर्ण नगर भ्रमण करीत घरा दारा पुढे असलेल्या एकट दुकट नागरिकांना विनंती करुण घरात राहण्याची सुचना देत तर नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे संपूर्ण शहर कोरोना वायरस च्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न करित असुन प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे डाँ भुषन सेंबेकर,डॉ छेनीया सह इतर कर्मचारी आपल्या कर्तव्यावर असुन कोणत्याही अप्रिय घटनेला तोंड देण्यास सज्ज तर महाराष्ट्र राज्य परिवन विभागातील सावनेर आगारातही चालक,वाहक व तांत्रिक विभागातील कर्मचारी गरज भासल्यास “आम्ही तयार आहो” चा जणुकाही संदेश देत असल्याने संपूर्ण प्रशासकीय व्यवस्था पुर्ण पणे सज्ज असल्याचे व जागतिक महामारीचे स्वरूपघेऊ पाहणार्या कोरोना वायरस चा हा तिसऱ्या चरणातील प्रादुर्भाव टाळण्याची जिद्द संपूर्ण प्रशासकीय यंत्रणे सोबतच नागरिकांमधे दिसुन आली*

*तर सायंकाळी घडीचा काटा पाच वर येताच घरा दारातून टाळ्यांचा कडकळाटी सोबतच भांडे वाजवीण्याचा तीव्र ध्वनी सोबतच पुरातन शीव मंदिर पहलेपार,हनुमान मंदिर आदी ठीकाणावरुण शंखनाद टाळमु्दंग, वादंनाचे मधूर स्वर वाजू लागले यावेळी काही उत्साही मंडळी रस्त्यावर उतरु पाहत असल्याचे निदर्शनास येताच पोलीसांना हलक्या स्वरुपाचा बळ प्रयोग करायचा देखावा करुण रस्त्यावर उतरु पाहणार्यां यवकांना पांगवण्या करीता अथक परिश्रम करावे लागले हे विषय*
*सावनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी नागरिकांना विनंती करत म्हणाले की नागरिकांनी या राष्ट्रीय आपदेच्या वेळी देशाचे मा.पंतप्रधान राज्याचे मा. मुख्यमंत्री,मा.जिल्हाधिकारी, तहसीलदार साहेब आदिंच्या आदेशाचे पालन करुण कटू प्रसंग आपणावर असे कु्त्य करु नये व शासनाच्या पुढील आदेशांचे जसे की सदर जनता कर्फ्यू परत पुढे पाहटे पाच वाजे पर्यंत वाढवीण्यात आले असुन जमाव बंदी कायदा कलम 144 चे पालन करुण सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली*

*जनता कर्फ्यू मधे आपल्या कर्तव्यावर असणारे तहसीलदार, पोलीस निरिक्षक,सर्व डॉक्टर्स, नर्स , पोलीस कर्मचारी,मेडिकल, सरकारी कर्मचारी, अँबुलेन्स, पाणी पुरवठा अश्या सर्व अत्यावश्यक सेवा देणारे नगर परिषद कर्मचारी बंधू भगिनींना महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फे मानाचा मुजर व त्यांच्या कर्तव्य दक्षते करिता आभार*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …