Breaking News

*सावनेरकरांनो स्वतःहा सहकार्य करा, अन्यथा आम्हाला कडक कार्रवाई कराव्या लागतील- एस.डी.ओ अतुल महेत्रे* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी सावनेरात ऑन फिल्ड*

*सावनेरकरांनो स्वतःहा सहकार्य करा, अन्यथा आम्हाला कडक कार्रवाई कराव्या लागतील- एस.डी.ओ अतुल महेत्रे*

 

*अंमलबजावणीसाठी व आरोग्यासाठी घरात राहून सहकार्य करावे अन्यथा नागरिकांवर सक्ती करावी लागेल- मुख्याधिकारी- रविन्द्र भेलावे*

*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी सावनेरात ऑन फिल्ड*

*विनाकरण फिरण्यरा लोकांवर , दुचाकी, चारचाकी वाहनांवर कायदेशीर कारवाई होणार कुणाचीही गय केली जाणार नाही*- *अशोक कोळी(पो.नि. सावनेर)*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत सूरज सेलकर व दिनेश चौरासिया, सावनेर

 


*सावनेरएस.डी.ओ अतुल महेत्रे व तहसीलदार दीपक कारंडे यांनी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शहरातील शिवाजी चौक,गांधी चौक,खापा चौक,गडकरी चौक,बाजार चौक ,होळी चौक इतर मार्केट सह संपूर्ण परिसरात दौरा करुण नगरवासीयांनी आप-आपल्या घरात राहुन सहकार्य करावे अन्यथा आम्हास कारवाई करावयास बाध्य व्हावे लागेल असे आव्हान नगरवासीयांना केले.*


*’लॉकडाऊन’चा अर्थ नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये, असा आहे. परंतु दुर्देवाने अनेक दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहने रस्त्यांवर दिसून येत आहे. नागरिक घराबाहेर दिसून येत आहे.ही गंभीर बाब असुन शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्याचा कुणालाच अधिकार नाही संपूर्ण देशावार ओढावून आलेल्या या प्रसंगी स्वताची व आपल्या परिविराची सुरक्षा आपन आपल्या घरी राहुन करू शकतो तरी पण काही जन या ना त्या कारणाने बाहेर पडत आहेत ते चुकीचे आहे व अश्यात आपल्यावर प्रतिबंधक कारवाई होऊण कटू प्रसंग ओढावू शकतो*

*कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांनी घरातच राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला. मात्र दुर्देवाने अजूनही नागरिक घराबाहेर दिसून येत आहे. नागरिकांनी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी व आरोग्यासाठी घरात राहून सहकार्य करावे अन्यथा नागरिकांना सक्तीने घरात ठेवण्याकरिता कठोर पाऊल लागेल, असा इशारा तहसीलदार दीपक कारंडे यांनी दिला.*


*यापूर्वीही नागरिकांना घरातून बाहेर पडू नये, अशी वारंवार विनंती केली. त्याबाबत गांभीर्य न दाखविल्याने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्या सोबतच काल रात्री पासून कर्फ्यू लागू करण्यात आला. मात्र नागरिक रस्त्यांवर फिरत असल्याने कोरोनाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही, अशी खंत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षणासाठी या सर्व उपाययोजना केल्या आहेत. सुरक्षेसाठी नियम पाळण्याची गरज आहे. परंतु नागरिक ऐकत नसतील तर सक्तीने त्यांना घरात कोंडावे लागेल, असे पो.नी.अशोक कोळी म्हणाले.*

*31 मार्चपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. परिस्थिती नियंत्रणात असली तरी ती कायम राखण्याची गरज असून यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, व शासनाने ठरवील्याल्या वेळेवर फळभाजी,कीराणा,औषधी व जिवन आवश्यव वस्तु खरेदी करीता आवश्यक असल्यासच बाहेर पडावे विणाकारण फीरु नये असे आव्हान मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे यांनी केले*

*तर नागरिकांवर कारवाई*

*विनाकारण नागरिक बाहेर पडत आहे, हे योग्य नाही. त्यामुळे नाकाबंदी करण्याचे संकेत त्यांनी दिले. नागरिक बाहेर दिसल्यास पोलिसांकडून त्यांना विचारणा केली जाईल. एवढेच नव्हे तर जमावबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने केली असुन नागरिकांनी अनावश्यक बाहेर निघने टाळवे अशी विनंती सर्व प्रसार माध्यम व सावनेर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सुध्दा वारंवार करण्यात येत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …