*कोरोना वायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावकर्यांनी ओढली लक्ष्मण रेषा*
*तर वारंवार विनंती करुणही रस्ऊ निघणार्या वाहन चालकांना सावनेर पोलीसांनी पुष्प देऊण केले स्वागत*
*आठवडी बाजार असल्याने सकाळी 8-00 ते 11-00 त रस्तू ओसांडली नागरिकांची गर्दी*
*दिपक कारंडे सावनेर तहसीलदारांनी परत दिला मानवतेचा परिचय*
*कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी व पायदळी आपल्या गावास निघालेल्या कामगांराच्या चहा नाष्ता व भोजन व्यवस्थे करिता सामाजिक संस्था व समाजसेवींचा पुढाकार*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सुरज सेलकर व साहिल ढवळे*
*सावनेरः एकीकडे कोरोना वायरसचा प्रादुर्भाव दुसरीकडे नागरिकांची रस्त्यावर ओसांडून पडनारी गर्दी यामुळे पोलीस प्रशासन व नगर प्राशसाची दमछाक होत असुन वरिष्ठ पोलीस प्रशासनाने नागरिकांशी सक्ती न करण्याच्या सुचनांनमुळे आता रस्त्यावर गर्दी वाढत आहे तर ठिकठिकाणी ठेकेदारांनी आपले बंद करुण कामगारांना आपआपल्या घरी जा म्हणून धारेवर सोडले असुन परिवहनाचे साधन पुर्ण पणे बंद असल्याने दोन शे,चारशे कीलोमीटर पायी जाण्यास कामगार विवश असल्याचे चित्र आहे याकरिता गावकरी मंडळी, पोलीस प्रशासन, नगर प्रशासन,तहसील प्रशासना सोबतच सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते आप आपल्या परीने उदभवीलेल्या समस्येला तोंड देण्याकरीता विविध उपाययोजना करत आहे*
*सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे वारेगाव ग्राम पंचायत चे सरपंच कमलाकर बांगरे व उप सरपंच राजेश मेश्राम व त्यांचे सहकारी सदस्य तसेच गावकरी मंडळीने गावाच्या मुख्य प्रवेश व्दारावर लक्ष्मण रेषा ओढून बँरेकेटींग करून गावकर्यांचे गावाबाहेर जाने बंद तसेच शेतकरी शेतमजूर यांनी ही शेतात न जाण्याचा निर्धार केला असुन आवश्य कर्तव्यावर अथवा विशेष कार्याकरिता गावाबाहेर जाणार्यांना परत आल्यावर लक्ष्मण रेषा ओलांडण्यापुर्वा आपले हात पाय साबुन व सेनीटायझर नी किटाणू मुक्त करुणच त्यांना गावत प्रवेश दिला जात असुन बाहेरून येणार्यांना गावात प्रवेश बंद करुण आपल्या गावाचे संरक्षण करण्याचे सुप्त कार्य केले आहे*
*तर वारंवार विनंती करुणही विनंतीला मान न देऊन शुल्लक शुल्लक कामाचे बहाने करुण रस्त्यावर येणार्या नागरिकांना पोलिस अधिकारी पीएसआय निशांत जुनूनकर,एपीआय सतीश पाटील,वाहतूक अधिकारी अशोक आठवले,गुन्हे शाखेचे सुधीर यादगीरे सह पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधव हे गुलाबाचे फुल देऊन “आपण रस्त्यावर निघून शासनाच्या आदेशाची अवहेलना करुण कोरोना वायरस ला आपल्या नगरीत आमंत्रण देत असल्याबद्दल आपले आभार” असे म्हणत त्यांची समजूत काढुन त्यांना घरीच राहण्याची विनंती करत आहेत*
*तर ठेकेदारांनी सुरु असलेले काम बंद करुण कामगारांना वार्यावर सोडल्याने व परिवहनाची कोणतीही सोय नसल्याने दोनशे ते चारशे कीलोमीटर धिंदवाडा जिल्ह्यातील हरैई येथे पायी आपल्या घराला निघालेल्या 13 कामगारांना सावनेर चे तहसीलदार दिपक कारंडे यांनी परत आपल्या तर्फे स्वःखर्चाने वाहन उपलब्ध करुण मानुसकीचा परिचय दिला तर नगरीतील सामाजिक संस्था प्रयास तसेच आदिनाथ मिष्ठान्न भंडार चे संचालक समाजसेवी दिपक झिंजुवाडीयाँ यांनी कर्तव्यावर असलेले पोली कर्मचारी अधिकारी व पायी येणार्या कामगारांन करिता चहा नाश्ता पिण्याचे पाणी आदीची व्यवस्था करुण संकाटाच्या क्षणी आम्ही आपल्या सोबत असल्याचा परिचय देत नागरिकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे अशी विनंती शहर वासीयांना केली आहे*