Breaking News

*”गो कोरोना”साठी पाटणसावंगी ग्रामपंचायत ने केली गावबंदी* *गावात येणार्या पाचही रस्त्यावर बँरेकेट उभारुण स्वयःसेवी युवक करतात कर्तव्य बजावनी*

*”गो कोरोना”साठी पाटणसावंगी ग्रामपंचायत ने केली गावबंदी*

*गावात येणार्या पाचही रस्त्यावर बँरेकेट उभारुण स्वयःसेवी युवक करतात कर्तव्य बजावनी*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत विशेष प्रतीनिधि विनोद वासाडे व दिनेश चौरसीया*

*पाटणसावंगी : कोरोना चा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील ग्रामपंचायत प्रशासनामार्फत गावात येजा करणाऱ्या पाचही मार्गावर कठडे लावून रस्ता बंद करण्यात आला.*


*गावात एकूण पाच मुख्य रस्ते आहेत. देशात 14 एप्रिल पर्यंत लॉक डाउन चा कडक नियम सुरु असुन वेळोवेळी सूचना देऊनही पाचही रस्त्याने अनोळखी इसमांचा येजा करणे सुरु होते.*
*गावात होणारी गर्दी टाळून येथील स्थानिक नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने पाचही रस्ते बंद करुन त्यावर प्रशासनातर्फे पाच स्वयंसेवक ठेवण्यात आले. गावातील नागरिकांनी बाहेर जाऊ नये व बाहेरील नागरीकांना गावात प्रवेशबंदी केली असून गावातील बाहेर गावी गेलेल्या नागरिकांनी देखील दवाखान्यात जाऊन तपासणी करूनच गावात यायचे आहे.असा संदेश व सूचना ते नागरिकांना देत आहे.तसेच बाहेर गावाहून गावात येणाऱ्या नागरिकांची विचारपूस करुनच येऊ देत आहे. दवाखान्यात येणारे, भाजीपाला औषधी किराणा खरेदी करण्यासाठी येणारे, शेतमाल वाहतूक आदींना गावात प्रवेश मिळत असून विनाकारण गावात प्रवेश करणाऱ्यांना बंदी लावली आहे.गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही हा गावबंदी चा धाडसी निर्णय घेतल्याचे सरपंच अजय केदार यांनी सांगितले.*


*नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील पाटनसावंगी हे गाव स्थानिक आमदार व महाराष्ट्र शासनाचे पशु संवर्धन, दुग्ध विकास,क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांचे पैतु्क गाव असुन तालुक्यातील मोठी ग्राम पंचायत म्हणून ओळखल्या जाते आणी संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधणारी ग्राम पंचायत आहे येथील सरपंच ग्राम पंचायत सदस्यांनी सामुहीक निर्णय घेऊण गाव बंदीचा निर्धार करुण दररोज सकाळ संध्याकाळ किटनाशक फवारणी,साफसफाई,कचर्याची उचल,नाल्यांची सफाई सोबतच बाहेरून येणार्या व आलेल्यांची वरच्या वर तपासणी सह शक्यतोवर गर्दी टाळन्यावर विशेष भर दिल्या जात आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …