*पशु संवर्धन, दुग्ध विकास क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयास प्रत्यक्ष भेटी*

*सावधानी बाळगण्याची नागरिकांना विनंती*
सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर सोबत दिनेश चौरासिया
*सावनेरः–कोरोना संसर्ग ही राष्ट्रीय आपदा आपण सर्व मिडून सामना करावा असे संबोधन महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयात भेटी देऊन येथे कोरोना संसर्ग रोग संदर्भात आढावा घेत असुन मंत्री सुनील केदार यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, उमरेड, भिवापूर, मौदा, कामठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी राष्ट्रीय आपत्ती असलेल्या कोरोना रोगाबद्दल व त्यांच्या संभावित रुग्णांबद्दल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून माहिती घेतली.*
*ज्या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका, औषध, इतर वैद्यकीय साहित्याचा तुटवडा आहे तिथे तात्काळ सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.*
*सलग दुसऱ्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेर, रामटेक व परशिवनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्र ला भेटी दिली व होम कॉरोंटाईन रुग्णांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी उचित कारवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले*
*या वेळी राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आपले कर्तव्य चोखपणे पार पडणारे वैद्यकीय अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे विशेष कौतुक केले. जिल्हा पातळीवर कोरोनाचा प्रसार थांबविण्याकरिता सर्व प्रकारची शासकीय यंत्रणा कार्यरत करण्याचे निर्देश दिले.*
*तर समस्त जनतेला जाहिर विनंती केली की कोरोना या महाभयंकर रोगाला विनाष करिता आपण घरी रहा व विनाकारण बाहेर न निघता यशस्वी करा असे आव्हान केले आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज