Breaking News

*श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा व्दारे मुख्यमंत्री सहायता कोषात पाच लक्ष रुपये दान*

*श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा व्दारे मुख्यमंत्री सहायता कोषात पाच लक्ष रुपये दान*

*सामाजिक बांधीलकी जपत 31मार्च पासुन 14 एप्रील पर्यंत दररोज तीन हजार गरजू गरिबांना नियमित भोजन पुरविण्याचा ट्रस्ट चा संकल्प*

 

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*

*सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा ता.कळमेश्वर तर्फे कोरोना वायरस च्या निमीत्ताने देशावार ओढावलेल्या आकस्मिक स्थितीला तोंड देण्या करीता मा.अतुल म्हेत्रे उपविभागीय अधिकारी सावनेर यांचे हस्ते मा.उद्दव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना पाच लक्ष रुपयाचा धनादेश संस्थेचे सचिव अँड श्रीकांत पांडे यांच्या हस्ते देण्यात आला*


*देशावर ओढावलेल्या या परिस्थितीत निधीची कमतरता भासु नये याकरिता अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांन सोबतच दानदाते पुढे येईल देशहिता करीता आप-आपल्या परीने अर्थीक सहकार्य करत आहे.श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा या संस्थेची गणना क्षेत्रातील मोठ्या संस्थेत होत असुन सदर संस्थेच्या पदाधिकार्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कार्यास 31 मार्च पासुनच सुरुवात करुण सावनेर शहरासह आदासा,बोरगाव,निळगाव,सोनपुर ईत्यादी गावातील गरजू गरीबांना अन्न धान्य तसेच सकाळ संध्याकाळ जवळपास तीन हजार लोकांना घर पोहच जेवणाची व्यवस्था करुण देत आहे सोबतच ज्या नागरिकांन जवळ राशन कार्ड उपलब्ध नाही अश्या गरजूंना दहा कीलो गहू,पाच कीलो तांदूळ, एक कीलो गोडे तेल,एक कीलो डाळ,हिरोती,मीठ इत्यादी किमान आठ दिवसीय जिवनावश्यक वस्तुंचे वाटप दररोज टप्प्या टप्प्यात केले जात असून 14 एप्रील पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील संचारबंदी (लाँकडाऊन) असे पर्यंत तर ही सुवीधा निरंतर सुरु राहील असे मत ट्रस्ट चे सचिव अँड् श्रीकांत पांडे यांनी व्यक्त करित म्हटलं की आवश्यक पडल्यास सदर सेवाकार्य पुढे ही सुरु ठेवण्यावर संस्था अध्यक्ष व पदाधिकारी विचार करत असल्याचे मत व्यक्त केले*


*तर श्री गणपती देवस्थान ट्रस्ट आदासा व्दारे देण्यात आलेला पाच लक्ष रुपयाचा धनादेश स्वीकार करत उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सदर संस्थेच्या पदाधिकारींचे आभार मानतं म्हटले की देशावर ओढावलेल्या रा परिस्थितीत सामाजिक व धार्मिक संस्था सोबतच दान दात्यांवर देशाला या संकटातून बाहेर काढण्यखकरिता सर्वांना पुढाकार घेणे गरजेचे आहे.मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री राहत कोषात निधी असल्याने कोणत्याही परिस्थितीला तोड़ देण्यास सोईचे जाते म्हणून दान दात्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्र हितात आपले योगदान द्यावे असे आव्हान याप्रसंगी केले*
*याप्रसंगी श्री गणपती देवस्थान ट्रस्ट चे कार्यकारी विश्वस्त जयंत मुलमुले,मोरेश्वर धोटे,अण्णाजी चव्हाण, दिपक कोल्हे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते*

 

 

 

 

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …