Breaking News

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दारू तस्करीला उधाण गडचांदूर पोलिसांकडून लाखोंच्या दारूसह मुद्देमाल जप्त- दोन अटक तर एक फरार

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दारू तस्करीला उधाण

गडचांदूर पोलिसांकडून लाखोंच्या दारूसह मुद्देमाल जप्त

दोन अटक तर एक फरार.

विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे

कोरपना :- गेल्या 22 मार्च पासून जिल्ह्यातील संचारबंदी /लाँकडाऊन आहे .तरी नागरिकांना घराबाहेर निघण कठीण आहे .
साध्या अख्ख्या जगात “कोरोना” विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून संसर्गापासून जनतेचे रक्षणासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.सर्वत्र शुकशुकाट पसरला असून लोकांनी स्वतःला घरातच कोंडून घेतल्याने शहरातील गजबजलेल्या रस्ते निर्जन पडले आहे.असे असतानाही अवैध दारू तस्करी काही थांबत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे .6 एप्रिल रोजी गडचांदूर पोलिस WCL पैनगंगा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील सीमेलगत कैलासनगर येथून कार द्वारे दारूची तस्करी होत असल्याची माहिती गुप्तहेराकडून मिळाली.लगेच सदर रस्त्यावर नाकाबंदी करीत असताना याच दरम्यान विरूद्ध दिशेने एक कार भरधाव वेगाने निघून गेली.त्याचा पाठलाग करून पकडले आणि झडती घेतली असता सदर कार मध्ये “मेकडॉल नंबर 1,रॉयल स्टेज,बीअर अशी एकूण 2 लाख 14 हजार रुपयेची विदेशी दारू व कार किंमत 5 लाख तसेच पायलाटींगसाठी वापरलेली स्कुटी किंमत 20 हजार असा एकूण 7 लाख 34 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना अटक करून दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एक आरोपी फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहे.सदर कारवाई ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वाखाली शकील अंसारी व इतर पोलिस कर्मचार्‍यांनी केली आहे.सध्या संचारबंदीचा गैरफायदा घेत दारू तस्करांनी डोकेवर काढल्याचे दिसत असून कैलासनगर येथून अंतरगाव / सांगोडाफाटा /गाडेगाव टू आवारपूर मार्गे विवीध वाहनांनी दारू तस्करी होत असल्याची माहिती असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसाकडून दारूबंदीची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येत असल्याचे पहायला मिळत आहे.येथील पोलीसाची धाळशी कामगिरी मुळे अवैध दारू विक्री तस्करांचे धाबे दनाले आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …