*टवाळखोरांनो सावधान आता ह्यांची सटकली*
*सावनेर पोलीसांची गर्दी पांगविण्यास सुरुवात*
*38 दुचाकी वाहन चालान तर टवाळखोरांना उठाबशी*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः लाँकडाऊन,जमावबंदी व सोशल डिस्टंन्सिंगला झुगारुन शहरातील मुख्य रस्त्यावर उतरनारी गर्दी कमी करणे हे पोलीस व स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे परंतू भाजीपाला, कीराणा,दुध दही,औषधी तसेच बँक आदीचे कारणे सांगून बिनधास्त रस्त्यावर उतरत असलेल्या गर्दीला पांगविन्याकरिता आता स्थानिक पोलीस सज्ज झाल्याचे दिसून येत आहे*
*एकीकडे राज्याचे गु्हमंत्री अनिल देशमुख दुरचित्र वाहिनीवर दिलेल्या मुलाखातीत म्हणतात की पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या काठीला सेनिटाझींग करुण ठेवा व त्याचा उपयोग करा तर दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी नागरिकांना प्रेमाने समझाविन्याचे व सक्ती न करण्याच्या सुचना देतात अश्यात रस्त्यावर उतरनारी गर्दी थांबनार कशी.एक पोलीस अधिकारी कर्मचारी एकटाच शेकडोचा जमाव पांगवण्याची क्षमता ठेवतो परंतू याकरिता पोलिसांना थोडी तरी स्वतंत्रता असने आवश्यक आहे*
*सावनेर शहरात ही रस्त्यावरील गर्दी नवी बात नाही अश्यात हतबल होऊ पाहणार्या पोलीसांनी “ना सक्ती,ना बाजीराव” चा अवलंब करित गांधी पुतळा,गडकरी चौक,बाजर चौक इत्यादी ठीकाणी अनावश्यक गर्दी करणार्यांना हेरुन त्यांना तास भर त्याच ठीकाणी उभे ठेवून काही उठाबश्या करवून घेत तसेच बीन कामाने रस्त्यावर टवाळखोरी करणार्यांच्या दुचाकी वाहनावर चालान करण्याच्या कारवाईला सुरुवात केल्याने रस्त्यावरील गर्दी हळूहळू कमी होऊ लागली आहे व पोलीस कर्मचार्यांच्या या कारवाई चे सर्वत्र स्वागत केल्या जात आहे सदरच्या कारवाईत 38 दुचाकी वाहन चालकांवर वाहन कायद्या नुसार कारवाई करूण 8700 रुपये दंड आकारण्यात आला*
*सदर कारवाईत पीएसआय निशांत जुनोनकर,एपीआय सतीश पाटील,वाहतूक नियंत्रक अधिकारी अशोक आठवले,दिनेश काकडे,निलेश तायडे,गणेश उइके,धोंडीबा नागरमोते,प्रकाश नांदुरकर,विशाल इंगोले आशीष कारेमोरे,हे.का.इस्माईल शेख,हिम्मत राठोर,सुनील व्यवहारे,राजेंद्र यादव,गौतम मेश्राम,प्रकाश ढोके,दिनेश गाडगे,भारती सुरजुसे,रंजना नागमोते,सुलोचना दुपारे,साबीया शेख,दतात्रय दिंडे सह नगर परिषद सावनेर चे मुख्याधिकारी रविन्द्र भेलावे व त्याचे अधनिस्थ कर्मचाऱी आदींनी भाग घेत आम्ही पण आपल्या सारखेच नागरिक आहोत आमच्या धर्यांची परिक्षा घेऊ नका असा जनुकाही संदेशच दिला*