तुषार कुंजेकर यांची नागपुर जिल्हाध्यक्ष पदी निवड
अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्था चे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष यांना महाराष्ट्र न्यूज़ मीडिया तर्फे शुभेच्छा
विशेष प्रतिनिधि
खात – अमरावती येथिल अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्थेच्या नागपुर जिल्हाध्यक्ष पदी खात येथिल तुषार ग्यानिरामजी कुंजेकर यांची नियुक्ति करण्यात आली आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद लक्ष्मणराव मेहरे यांनी कुंजेकर यांना नियुक्ति पत्र दिले आहे.
अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्था पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यपातळीवर कार्यरत असणारी संस्था असून राज्यातील विविध जिल्ह्यात संस्थेच्या शाखा आहेत राज्यभरात संस्थेने पदाधिकाऱ्याची नियूक्ती केली आहे
तुषार कुंजेकर हे गेल्या ६ वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहेत.दैनिक सकाळ, नवराष्ट्र, महाराष्ट्र न्यूज मिडीया त्यांनी नागपुर जिल्ह्यात वार्तांकन केले आहेत वेगळ्या वाटेवरी समाजाभीमुख बातमीदारी हे त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य आहे.नागपुर जिल्ह्याचे असंख्य अप्रकाशित कुंजेकर यांनी उजेडात आणले आहेत.उत्तम गायीकी, प्राणी-पक्षी प्रेमी सामाजीक कार्यकर्ता, ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रेक्टर अशी त्यांची ओळख आहे.
अखिल पत्रकार कल्याण बहूउद्देशिय संस्थेच्या माध्यमातुन पत्रकारांच्या कल्याणासाठी आणी त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी कार्यरत राहण्याचा मनोदय तुषार कुंजेकर यांनी व्यक्त केला.त्याचप्रमाणे लवकरच नागपुर जिल्हयातील प्रत्येक तालुक्यासाठी अखिल पत्रकार कल्याण बहुद्देशीय संस्थेची कमेटी बनवीली जाईल असे त्यांनी सांगितले कुंजेकर यांच्या नियुक्तिने जिल्हाभरात कौतुक केले जात आहे. तापेस्वर वैध सभापती जिल्हा परिषद नागपुर, राकेश बागडे अनु.जा.तालुका अध्यक्ष, स्वप्नील श्रावणकर पं.स.सदस्य, शंकर वैध उपसरपंच, कैलाश वैध माजी ग्रा.पं.सरपंच इंजि.राजेंद्र रावते ग्रामीण पत्रकार संघ नागपुर जिल्हा कार्याध्यक्ष, शैलेश रोशनखेडे ग्रामीण पत्रकार संघ नागपुर जिल्हा सरचिटणीस, चक्रधर गभने ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष मौदा तालुका, रोहण मेहर, दर्शन डहाके, जामुवत ठाकरे राजकुमार ठवकर माजी पं.स.सभापती मौदा, शैलेश गिर्हेपुंजे, लोकेश आकरे, रोशन तांबुलकर व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Maharashtra News Media सच की आवाज