Breaking News

*कोवीड़ 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना प्रशिक्षण संपन्न* *मा.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व पुर्व तयारी*

*कोवीड़ 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना प्रशिक्षण संपन्न*

*मा.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना व पुर्व तयारी*

*210 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना प्राथमिक प्रशिक्षण देऊन 210 प्रगणक टीम सज्ज*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर*
*सावनेरः संपूर्ण विश्वाला आपल्या संसर्गजन्य विषाणू ने विठीस धरणारा कोरोना वायरस चा प्रादुर्भाव भारतात ही आता पाय पसरवू लागला असुन दिवसेंदिवस कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे नागपूर शहरा सोबतच आता ग्रामीण भागात ही कोरोना वायरस विषाणू ग्रस्त रुग्णांची नोंद होण्यास सुरुवात झाली आहे.*

 

*या अनुशंगाने मख.रविन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर यांचे दिशानिर्देश व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 30/30/34/41 व 51 तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार कोरोना वायरस चा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी आवश्यकते नुसार तसेच कोरोना विषाणू बाधीत रुग्ण आढळल्यास त्या परिसरास (कंन्टेनमेंट झोन) घोषित करुण उपाययोजना आखणी करण्याच्या हेतूने पुर्व तयारी म्हणून सावनेर येथील कै.राम गणेश गडकरी सभागृहात नगर प्रशासनाच्या सुभाष प्राथमिक शाळा मराठी, हिंदी, पलिया प्राथमिक शाळा, अभ्यंकर प्रा.शाळा,नगर परिषद हायस्कूल, जवाहर कन्या विद्यालय, भालेराव हायस्कूल व जवाहर हायस्कूल खापा येथील 210 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना “कोवीड़ 19” या विषाणूग्रस्त रुग्णांचे प्राथमिक लक्षण तसेच त्यावरील उपाययोजना या संदर्भात प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुषन सेंबेकर,डॉ. संदीप गुजर आदिंनी सविस्तर माहिती देऊन शहरावर येणार्या कोरोना वायरसच्या प्रादुर्भाव निर्मित कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याकरिता तयार राहण्याचे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले*
*जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रशिक्षणाचे महत्व असे की भविष्यात आपल्या शहरात कोरोना वायरस या संसर्गजन्य विषाणूचा रुग्ण आढळल्यास त्या परिस्थितीत ते क्षेत्र (कंन्टेनमेंट झोन) घोषित करुण रुग्ण आढळलेल्या परिसरास सील करुण तेथील प्रत्येक नागरिकांची तपासणी करुण त्याची माहीती वरिष्ठांना द्यावी.सदर संसर्गजन्य कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावनेर शहरातील एकूण 13 हजार कुटुंबातून वास्तव्यास असणार्या जवळपास 35 हजार नागरिकांकरिता होणार्या सर्वेक्षणाकरिता प्रती 50 कुटुंबाकरिता एक प्रगणक नेमून प्रगणक हा प्रत्यक्ष प्रत्येक कुटुंबात पोहचून कोरोना वायरस विषाणू व्दारे बाधित होणारे प्राथमिक लक्षणाची नोंद करुण सदर माहीती प्राथमिक आरोग्य केन्द्राचे आरोग्य सेवक (पर्यवेक्षक) यांना सदर माहीती देतील तसेच सदर पर्यवेक्षक हे आपले डाँक्टरांना व डॉक्टर तहसीलदार व तहसीलदार जील्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असे टीम वर्क होऊण या कोरोना वायरस चा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशानुसार आयोजित सदर प्रशिक्षण दिपक कारंडे तहसीलदार सावनेर,रविंन्द्र भेलावे मुख्याधिकारी सावनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले*
*या आपत्ती व्यवस्थापनात कार्य करणार्या 210 शिक्षक व शिक्षकेत्तर कयर्मचारी यांना प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे वैद्यकीय अधिकारी डॉ भुषन सेंबेकर,डॉ. संदीप गुजर,डॉ. शिवानी छेनीया,डॉ. अजिंक्य,डॉ आयशा आदिंनी कोरोना वायरस च्या प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी घेण्यात येणार्या दक्षता व उपाययोजना यांची माहिती दीली तर सदर प्रशिक्षण शीबीराच्या यशस्वीते करिता नगर परिषदेचे दिनेश बुधे,नितीन चाचरकर,पंकज छेनीया,पुरषोत्तम पांडे,नितीन मदनकर,रोशन धोटे,निशांत धुर्वे,अनिल गोवर्धन,विनायक पोटोडे,धिरज देशमुख, प्रीती मेंढे तर प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे आरोग्य सेवक ठाकरे,अशोक घोडसे,घनश्याम तुर्के आदिंनी परिश्रम घेतले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …