*वाघाच्या हल्ल्यात एक मजूर ठार: आरमोरीत दहशत*

*वाघाच्या हल्ल्यात एक मजूर ठार: आरमोरीत दहशत*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

गडचिरोली: जंगलात कुड्याची फुले तोडण्यास गेलेल्या एका इसमास वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना काल दिनांक 16/04/2020 सकाळी ८ वाजताच्या सुमारास आरमोरी येथील प्रादेशिक टसर रेशिम कार्यालयानजीकच्या भागात घडली. ज्ञानेश्वर नीळकंठ कांबळे(४५)रा.आझाद चौक्, आरमोरी असे मृत इसमाचे नाव आहे.

घटनास्थळाचे जंगल हे टायगर कोरिडोर म्हणून ओळखले जाते. या भागात अधूनमधून वाघाचे दर्शन होत असते. त्यामुळे वनविभागाने या भागात चौकीदार ठेवले आहेत. तरीही नागरिक जंगलात जात असतात. आज सकाळी ज्ञानेश्वर कांबळे व आनंद सोनकुसरे हे दोघे जंगलात कुड्याची फुले तोडण्यासाठी गेले होते. एवढ्यात वाघ दिसल्याने आनंद सोनकुसरे झाडावर चढला. मात्र वाघाने ज्ञानेश्वर कांबळेवर हल्ला करुन त्यास ठार केले. त्यानंतर वाघ ज्ञानेश्वरचा मृतदेह घेऊन पळाला.

घटनेची माहिती मिळताच वडसा विभागाचे उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर हे वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक तसेच पोलिस पथकासह घटनास्थळी गेले. घटनास्थळापासून दीडशे मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला. आरमोरी येथील रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. वनविभागातर्फे मृतकाच्या कुटुंबीयांना ३० हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली आहे. आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते ही मदत देण्यात आल्याचे उपवनसरंक्षक निरंजन विवरेकर यांनी सांगितले.

*वन विभागाची शासकीय आर्थिक मदद*
वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीस वनविभागातर्फे १५ लाख रुपयांचे साहाय्य करण्यात येते. सर्व प्रकिया आटोपल्यानंतर ही मदत देण्यात येईल, असे श्री.विवरेकर यांनी स्पष्ट केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …