*ब्रेकिंग न्यूज* *खान क्र 2 व 3 परिसरात बिबट दिसल्याच्या चर्चेला उधाण..! *वेकोली कामगार व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना*

*ब्रेकिंग न्यूज*

*खान क्र 2 व 3 परिसरात बिबट दिसल्याच्या चर्चेला उधाण..!

*वेकोली कामगार व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*

*सावनेरः सावनेर परिसरातील खान क्र.2 व 3 परिसरातील वळणावर एका कामगारास रात्रीला बिबट दिसल्याच्या चर्चा रंगत असुन कामगार व परिसरातील शेतकरी बांधवात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे*
*मिळालेल्या माहितीनुसार अनिल बरघाने या खान कामगारास खान क्र 3 च्या पंखा क्षेत्राच्या वळणावर अचानक बिबट दिसल्याने त्याने समयसूचकतेने स्वतःचे संरक्षण करुण सदर घटनेची माहिती आपले वरिष्ठ अधिकारी ओव्हरमेन महेश पटवा यास देऊण इतर कामगारांना सतर्क करण्याची विनंती केली.अचानक खान परिसरात बिबट दिसल्याने कामगारांत तसेच परिसरातील शेतकरी बांधवात भीतीचे सावट आहे*

*खापा व कळमेश्वर वन परिक्षेत्राच्या सीमेवरिल बिबट असल्याच्या सदर घटनेची सत्यता जानुन घेण्याकरिता कळमेश्वर वन परिक्षेत्र अधिकारी अर्चना नौकरकर व खापा वन परिक्षेत्र अधिकारी नाईक यांना विचारणा केली असता सदर घटनेचे अद्याप ही सुचना नसल्याचे स्पष्ट करत म्हटले की सदर घटनेची सत्यता जाणून घेण्याकरिता पथक रवाना करण्यात येत असुन सदर बिबट संबंधित माहिती घेण्याचे कार्य सुरु आहे*
*जोपर्यंत सत्यता हाती येत नाही तोपर्यंत नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सावधगीरीने प्रवास करावा कारण की उन्हाळा तापू लागताच वन्यप्राणी पाण्याच्या शोधात रहवासी क्षेत्रात प्रवेश करतात व गाव वसाहती अश्या क्षेत्रा नजिक लपून बसतात व पाळीव प्राण्या सोबतच मणूष्यावर हमला करू शकतात म्हणून नागरिकांनी सतर्क रहावे अशी विनंती केली आहे*
*सदर बिबट संबधीत माहीती मीळाल्यास वन परिक्षेत्र अधिकारी अथवा वन मीत्र कींवा स्थानिक पोलिसांना सुचीत करावे असे आव्हान महाराष्ट्र न्यूज मीडिया द्वारे करण्यात येत आहे*
*सतर्क राहा व कटू प्रसंग टाळा*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …