Breaking News

*गुंडापल्लीच्या जंगलातून साडेसहा लाखांचा मोहसडवा जप्त*

*गुंडापल्लीच्या जंगलातून साडेसहा लाखांचा मोहसडवा जप्त*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली जंगल परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोहफुलांची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर धाड टाकून मोहसडवा व अन्य सामुग्री असा एकूण ६ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या सामुग्रीमध्ये ३००लिटर मोहफुलांची दारू, ३४०० किलो मोहसडवा व ७५ हजार रुपये किमतीच्या बजाज कंपनीच्या पल्सर मोटरसायकलीचा समावेश आहे.पोलिसांनी दारु व सडवा जप्त केला असला, तरी आरोपी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.

*अवैध दारू विक्रेता मुजोर; पोलीस हतबल*

वारांवार कारवाई होवुन सुद्धा दारू विक्रेता मुजोरिने दारू विकत आहेत. कोर्टातुन जमानत घेवुन पुण्हा दारू विक्री करत आहेत.सर्व सामान्य जनता ह्यना त्रासली असुन कठोर शिक्षेची मागनी होत आहे.

याप्रकरणी गुंडापल्ली येथील नेपाल हजारी मिस्त्री व हजारी मिस्त्री यांच्यासह इतर दोघांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार दादाजी करकाडे यांच्या नेतृत्वातील चमूने ही कारवाई केली.सर्वत्र पोलिसांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …