*काळाबाजार करणाऱ्या स्वस्थ धान्य दुकानदारांच्या गोडाऊनवर धाड*
*५० किलोचे ८१ कट्टे जप्त*
*स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कार्यवाही*
*काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले*
*दोन जण ताब्यात*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
खापरखेडा:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला आहे बाजारपेठ व्यापारपेठ बंद असल्यामुळे जिवनावश्यक वस्तू मिळने कठीण झाले आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य व गरजू लोकांना सरकारी स्वस्थ धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वितरित करण्यात येत आहे मात्र सरकारी स्वस्थ धान्य विक्रेत्ये काळाबाजार करीत असल्याचे निदर्शनास आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी काळाबाजार करणाऱ्या स्वस्थ धान्याच्या दुकानदारांच्या मुसक्या आवळल्या आहे सदर घटना खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील सिल्लेवाडा येथे घडली असून काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांच्या गोदामातून ५० किलो तांदळाचेे ८१ कट्टे जप्त केले आहे यासंदर्भात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा वार्ड क्रमांक ५ येथे डी.एल.कळमकर यांचे स्वस्थ धान्याचे दुकान आहे डी. एल. कळमकर रा पांजरा कोराडी व दिलीप कळमकर रा सिल्लेवाडा हे दोघेही मागील अनेक दिवसांपासून स्वस्थ धान्याच्या दुकानात संगनमत करून काळाबाजार करीत होते यासंदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांना मिळाली माहितीच्या आधारावर फिर्यादी तालुका पुरवठा निरीक्षक स्मिता नायगावकर वय 42 यांना माहिती देऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते यांनी सिल्लेवाडा येथील डी.एल.कळमकर यांच्या स्वस्थ धान्याच्या दुकानावर धाड टाकली यावेळी दिलीप भगवान कळमकर हजर होता तालुका पुरवठा निरीक्षक नायगावकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कळमकर यांच्या गोदामची झडती घेतली असता स्वस्थ धान्य दुकानातील तांदळाची ५० किलोची एकूण ८१ पोती आढळून आली कळमकर यांच्या गोदमातून जवळपास ४०.५० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला असून शासकीय दराने त्याची किंमत १२ हजार १५० रुपये इतकी आहे फिर्यादी स्मिता नायगावकर यांनी यासंदर्भात खापरखेडा पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली असून डी.एल.कळमकर व दिलीप कळमकर याना ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी जिवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सदर कार्यवाहीत तालुका पुरवठा निरीक्षक स्मिता नायगावकर, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहाय्यक पोलीस पोलीस निरीक्षक लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, विरेंद्र नरड, निलेश बर्वे, सत्यशील कोठारे,शैलेश यादव, प्रणय बनाफर यांनी भाग घेतला.
Maharashtra News Media सच की आवाज