*सवनेर शहरात लाँकडाऊन व सोशल डिस्टंसींग ची ऐसी की तैसी* *सावनेरकरांना स्थानिक प्रशासनाच्या वेळकाढू व लचर प्रणालीची किम्मत तर मोजावी लागणार ना…?*

*सवनेर शहरात लाँकडाऊन व सोशल डिस्टंसींग ची ऐसी की तैसी*

*सावनेरकरांना स्थानिक प्रशासनाच्या वेळकाढू व लचर प्रणालीची किम्मत तर मोजावी लागणार ना…?*

*आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळी मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार काय…?*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरः कोवीड़ 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केन्द्र व राज्य शासनाने सक्तीचे पाऊल उचलत असुन सुध्दा कोरोना वायरस लागन असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.वाढत असलेली संख्या जरी नियंत्रणात मानत असलो तरी रेड झोन नागपूर शहर व तेथून सावनेर शहरात येणारे फळभाज्या किराणा व शासकीय निमशासकीय शेकडो कर्मचाऱ्यांचे आवागमन सवानेर करांन करिता घातक ठरू शकतो.*

*स्थानिक उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे व तहसीलदार दिपक कारंडे यांनी तालुक्यातील सर्व पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी,व्यापारी संघ,भाजीपाला विक्रेते,वैद्यकीय अधिकारी आदिंच्या बैठका घेऊण रस्त्यावर उतरणारी गर्दी व यावरिल उपाययोजना आखून दररोज सकाळी 8-00 ते 12-00 या दरम्यान जिवनावश्यक वस्तू विक्रीची मुभा उपलब्ध करुण दिली तर वैधकीय दवाखाने व औषाधालय दिवस भर व भाजीपाला विक्रेत्यांना शहरात फीरुन व्यवसाय करण्याच्या सुचना दिल्यात*

*तर नगर प्रशासनाने नगरवासीयाँना चार प्रकारच्या पासेस देऊन प्रत्येक परिवास दर चार दिवसाने खरेदी करण्याकरिता घराबाहेर पडण्याची सोय करुण दीली असता ही दररोज रस्त्यावर उसळणारी गर्दी व सोशल डिस्टंसींग च्या गंभीर समस्येला सामोर जावे लागत आहे*

*लाँकडाऊन दरम्यान जमावबंदी कायद्या अंतर्गत कारवाई होतांना दिसत नाही,बँरेकेटिग असुन सुध्दा जड वाहनांचे आवागमन,रस्त्यावर उभे राहून भाजीपाला व्यवसाय करणार्या व्यवसाईकांची दररोज वाढती संख्या सोबतच रेड झोन नागपूर मधून शहरात येणार्या फळभाज्या,कीराणा सोबतच नागपूर शहरातील विविध भागातून कर्तव्यावर येणारे शेकडो शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी व त्याच्या संपर्कात येणारे नगरवासी,किराणा दुकान,भाजीपाला दुकानात असणारी गर्दी,रस्त्यावर धावनारे दुचाकी चारचाकी वाहने,चेहऱ्यावर मास्क न लावनारे आदिंवर सामुहिक रित्या दंडात्मक कारवाया कराव्यात अशी मागणी नागरिकातुन होत आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …