*भानेगाव परिसरात मास्क, सँनिटायझर वाटप व जनजागृती*
*नागपूर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर:- आज भारत देशासह संपूर्ण जगात कोविड-19 ने थैमान घातले आहे. संपूर्ण मानव जीवनावर खूप मोठे संकट या कोरोना विषाणूने निर्माण केले आहे. याच्या प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरातून विविध प्रयत्न सुरू आहे. त्याच्याच एक भाग म्हणून बॅरिस्टर शेषराव वानखडे कला वाणिज्य महाविद्यालय खापरखेडा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे भानेगाव परिसरात कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत नागरिकांना सँनिटायझर, मास्क चे वाटप करण्यात आले तसेच गावामध्ये सँनिटायझर फवारणी करण्यात आली ही मोहीम राबविण्याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. जी. टाले
कार्यक्रम अधिकारी डॉ आर. पी. राऊत कार्यक्रम अधिकारी उमेश जनबंधू, मोहन खाडे, किशोर शेंडे, मयूर खंडाते, ऋषाली तरोने व काही संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम राबवित असताना सामाजिक अंतराचे भान व काळजी घेऊन कार्यक्रम राबविण्यात आला.