*सामाजिक बांधिलकी जोपासत पोलीस कर्मचारी स्वप्निल बोंन्डे यांचा सत्कार*

*सामाजिक बांधिलकी जोपासत पोलीस कर्मचारी स्वप्निल बोंन्डे यांचा सत्कार*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- भारत देशासह संपूर्ण जगात कोरोनाने कहर माजविला असून सर्वांचे जीवन विस्कळीत झालेले आहे. सर्वजण आप आपल्या परीने कोरोना रोखण्याकरिता प्रयत्न करीत आहे. त्यात महत्वाच्या विभाग म्हणजे पोलीस आपले कर्तव्य प्रामाणिक पणाने पार पाडत आहे. या धकाधकीच्या जीवनात पोलिसांना कळत ही नाही की कभी खुशी, कभी गम आपल्या कुटुंबाला वेळ बरोबर देत नसून बारा बारा तास कर्तव्यावर हजर राहावे लागत आहे. लोकांना हात जोडून, फिल्मी गीत गाऊन, नाहीतर दंडाचा महाप्रसाद देऊन समजवत आहे की घराबाहेर पडू नका, घरातच रहा, सुरक्षित रहा असा संदेश देत आहे. या संकटकाळी स्वतःचा वाढदिवस सुद्धा त्यांच्या लक्षात नाही. खापरखेडा पोलिस स्टेशनचे स्वप्निल बोंन्डे पोलीस शिपाई (खुपिया विभाग) यांच्या वाढदिवस खापरखेडा पोलीस स्टेशन येथे मित्रमंडळींनी साधेपणाने साजरा करण्यात आला सोशल डिस्टिंग, तोंडाला मास्क बांधून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. पोलीस शिपाई स्वप्नील बोंन्डे यांनी केक कापला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खापरखेडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे होते. चंद्रकांत काळे यांनी स्वप्निल बोंन्डे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गोविंद दहिफळे (ट्राफिक विभाग), नितेश पिपरोदे तर खापरखेडा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बाळापुरे, आशिष फुटाणे, बाल्या घोडमारे, पत्रकार कपिल वानखेडे आधी पोलीस कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …