गडचिरोली जिल्ह्यास वादळाचा तडाखा, कुरखेडात बीएसएनलचे टॉवर कोसळले*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: आज २७ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यास वादळाने चांगलेच झोडपून काढले आहे. वादळ एवढे तिव्र होते की, कुरखेडा येथे चक्क बीएसएनएलचे टॉवर कोसळले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.
आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास प्रचंड वादळास सुरूवात झाली. काही ठिकाणी वादळासह पाऊस व गारपीटही झाली. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे नागरीक फारसे बाहेर पडलेले नव्हते. यामुळे कुठेही जिवीतहाणी झाल्याची घटना घडलेली नाही. कुरखेडा येथील बीएसएनएलचे टॉवर कोसळल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.