सिन्देवाही तालुक्यातील सलून व्यवसायीकांवर लाँकडाऊन मुळे उपासमारीची वेळ
पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार साहेबांना निवेदन
सिन्देवाही प्रतिनिधि-दिपक लोखंडे
सिन्देवाही–राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादृभाँव रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लाँकडाऊन मुळे सलून व्यवसायीकांची दुकाने 22माचँ पासुन बंद आहेत पुन्हा अनिश्चित काळासाठी सलून दुकाने बंद राहणार असल्याने उत्पन्नाचे मागँ बंद राहिल्याने नाभीक समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे बरेच सलून व्यवसाय हे भाडेतत्त्वावर आहेत तसेच अनेक व्यवसायिक हातावरती कमावणारे असुन त्यांना दुसरा जिवणनिवाँहाचा आधार नसुन कुटुंबाच्या आथिँक गरजा कशा पुणँ कराव्या हा प्रश्न कुटूंब प्रमुखासमोर उभा राहिला आहे त्यामुळे नाभीक समाजाला व व्यवसायीकांना आथिँक मदत मिळावी या उद्देशाने सिन्देवाही तालुका संत नगाजी नाभीक समाजाचे अध्यक्ष श्री कवडुजी मांडवकर, भुपेन्दर पगाडे, सचिव श्री ज्ञानेश मुत्तलवार तसेच सलून अशोशियनचे अध्यक्ष श्री संजय मेंढुळकर, प्रकाश चेरकू सचिव श्री आनंद खडसिंगे, दिनेश देवगडे यांनी जिल्हाचे पालकमंत्री नामदार विजयभाऊ वड्डेटीवार साहेब, खासदार मान श्री अशोक भाऊ नेते साहेब, मान जिल्हाधिकारी साहेब चंन्दपुर, तहसिलदार साहेब यांना निवेदनाव्दारे आथिँक मदतीची मागणी केली आहे