भाग -2
*रस्त्यावर धावतात बिन क्रमांकाचे यमदुत भाग (2)*

*बिन क्रमांक व बिन परवाना वाहने कुण्याच्या परवानगी ने*

*प्रशासकीय यंत्रणेवर मुख्याधिकारींचे नियंत्रण नाही का…?*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
सावनेर– नगर पालिकेच्या आखत्यारित असलेल्या शहरातील घनकचरा संकलन करणार्या वाहनांवर खरेदीपासुनच राज्य परिवहन विभागाचे मान्यताप्राप्त क्रमांक नाही जेव्हा क्रमांकच नाही तर वाहन अपधात संरक्षण विमा कोठून राहणार अश्या स्थितीत जर एखद्या अपधात झाल्यास याची जबाबदारी मुख्याधिकारी रवींद्र भेलावे स्विकारणार काय…?

*शहरातील सदर वाहने घनकचरा संटलना करिता दररोज नगरिच्या विविध प्रभागातील गल्या बोळ्यात खुलेआम पणे भरधाव वेगाने धावतात सदर वाहनांचा भोंगा (हार्न)सोडून सर्वच वाजते,वाहनाचा इतका घाण वास येतो की त्यात कचरा टाकने ही किळसवाणे वाटते,यावरून सिध्द होते की वाहनांची वरच्यावर वाँशीग ही होत नाही,म्हणजे वाहनांचे व्यवस्थापन व देखभाल उचीत प्रमाणात होत नसल्याचे उघडकीस येत आहे.तर कचरागाडीत कचरा टाकण्याकरिता आबालवृद्धां सोबतच लहान मुले,महिला पुरुषांची गर्दी असते अश्यात कोणत्याही अनुचित प्रकार घडून एखाद अपधात घडल्यास पिडीत परिवारास वाहन सुरक्षा विम्याचा ही लाभ मिळने कठीणच दिसून येत आहे जर असे काही घडले तर पीडित परिवारास हा लाभ मुख्याधिकारी देणार की कांत्रटदार देणार*

*शहरातील घनकचरा उचल करण्याचे कार्य कांत्रटदारांच्या सहाय्याने सुरु असुन कचरा उचलकार्य सुरु आहे तर सदर कांत्रटदार वरच्यावर वाहनांचे व्यवस्थित संगोपन करतो की नाही यावर लक्ष कोण देणार*
*नगर परिषदेच्या घनकचरा संकलन व व्यवस्थापणात जर इतका मोठा घोड़बंगाल आहे तर इतर विभागाचे काय असा सवाल नगरवासीयाँना पडू लागला आहे*
*वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर विषयावर लक्ष देऊन नगरवासीयाँच्या जिवीतेचा खेळ मांडणार्या अधिकार्यांवर योग्य कारवाई करुण नगरवासीयाँच्या जिवीतेचे संरक्षण करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज