*लाँकडाऊन नियमांचे उल्लंघन करून खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे दोन कार्यकारी अभियंता नागपुर जिल्हायांची सिमा तोडून चंद्रपुर जिल्हयात सापडले*
*शासनाच्या नियंमाची पायमल्ली*
*खापरखेडा औष्णिक विघुत केद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांचे उत्तर देण्यास मौन*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
नागपुर:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाचे संपूर्ण महाराष्ट्र लाँकडाऊन केलेले असता गाव, जिल्हे, सीमा बंद केलेल्या आहेत. सर्वजण कोरोनाव्हायरस कसा थांबवता येईल, यावर नवनवीन उपयोजना राबवीत आहे.
केंद्रशासनाने संपूर्ण देशात संचार बंदी लावण्याचे आदेश देण्यात आलेले असून त्यात अतिमहत्वाच्या सेवा देणारे डॉक्टर, महावितरण, महानिर्मिती, पोलीस, अति महत्वाचे अधिकारी यांना आपले कर्तव्य पार पाळण्यासाठी सूट दिलेली आहे.
खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रा मध्ये एकूण 1340 मेगावँट विज उत्पादन करण्यात येते. या विद्युत केंद्रामध्ये जवळपास 1200 कर्मचारी,अभियंते तसेच 2000 कंत्राटी कामगार काम करीत असतात.
एकीकडे नियमावर बोट धरून चालणारे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांच्या हद्देतील कार्यकारी अभियंता आपल्या वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता जिल्हा बंदी असताना पदाचा दुरुपयोग करून तसेच महानिर्मितीचे आय कार्ड दाखवून चंद्रपूर जिल्ह्यात कसे पोहोचले? या बद्दल महानिर्मिती कंपनी मध्ये चर्चा सुरू आहे त्यानीं लाँकडाऊन च्या नियमाचे सर्रास उल्लंघन केले आहे. हे माहीत झाल्यानंतरही त्या कर्मचाऱ्यांवर अजुनपर्यंत कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न सर्वांना निर्माण होत आहे.
यांचे उत्तर मुख्य अभियंता यांना सर्वांना द्यावेच लागेल कारण ते स्वतःच शिस्तीचे पालन करणारे अधिकारी आहे तर ते अशी बेशिस्त कशी खपवून घेणार
जर ते या प्रकरणी कार्यवाही करण्यास टाळाटाळ करीत आहे तर मग पाणी कुठे मुरते असा प्रश्न सर्वांना पडेल.
विश्वसनीय सूत्रा मार्फत माहिती मिळते की, प्रकरण दडपण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे आस्थापनेतील दोन कार्यकारी अभियंता आर. जी. पुणेकर व एस. के. तेलंग हे अधिकारी दि. २४/०४/२०२० ला सायंकाळी कुणाचीही परवानगी न घेता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात लॉकडाऊन मध्ये ओळ्खपत्राचा गैरफायदा घेत पोलीस प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून चंद्रपूर जिल्ह्यात गेलेत. चंद्रपूरला कोणालाही माहिती न दिल्यामुळे चंद्रपूर वसाहतीतील काही सुज्ञ नागरिकांनी तक्रार करून त्यांना शासनाकडे काँरंनटाईन केले.
त्यामुळे संपुर्ण महानिर्मिती कंपनीचे लक्ष लागले आहे की, खापरखेडा औ. वि. केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे त्यांच्यावर काय कार्यवाही करणार आणि एवढे शिस्तप्रिय अधिकारी असल्यावर एवढी हिम्मत दोनही अधिकारी यांनी कशी केली या बद्दल कामगार संघटना लक्ष देऊन आहेत.