Breaking News

*भानेगाव परिसरात मास्क, सँनिटायझर वाटप व जनजागृती* *भानेगाव ग्राम पंचायत सदस्य शलैश मरसकोल्हे यांचा अनोखा उपक्रम*

*भानेगाव परिसरात मास्क, सँनिटायझर वाटप व जनजागृती*

*भानेगाव ग्राम पंचायत सदस्य शलैश मरसकोल्हे यांचा अनोखा उपक्रम*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

खापरखेडा:- आज भारत देशासह संपूर्ण जगात कोविड-19 ने थैमान घातले आहे. संपूर्ण मानव जीवनावर खूप मोठे संकट या कोरोना विषाणूने निर्माण केले आहे. याच्या प्रतिबंध करण्यासाठी सर्वच स्तरातून विविध प्रयत्न सुरू आहे. त्याच्याच एक भाग म्हणून ग्राम पंचायत भानेगाव येथील सदस्य शलैश मरसकोल्हे भानेगाव परिसरात कोरोना जनजागृती अभियान राबविण्यात आले.

या अंतर्गत नागरिकांना सँनिटायझर, मास्क चे वाटप करण्यात आले तसेच गावामध्ये सँनिटायझर फवारणी करण्यात आली ही मोहीम राबविण्याकरिता काही संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यक्रम राबवित असताना सामाजिक अंतराचे भान व काळजी घेऊन कार्यक्रम राबविण्यात आला.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …