*खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता यांची गैरवर्तुणूक* *विघुत क्षेत्र तांत्रिक युनियने उठविला आवाज*

*खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता यांची गैरवर्तुणूक*

*विघुत क्षेत्र तांत्रिक युनियने उठविला आवाज*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- महाराष्ट्र राज्य कोरोनाव्हायरस मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच्या सामना प्रत्येक नागरिक, शासन, प्रशासन करत आहे. अशा परिस्थितीत कुठल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही मागविण्याची ही वेळ निश्चित नाही. याबाबत मला कल्पना असताना सुद्धा नाईलाजस्व खापरखेडा येथील कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता त्यांच्या भावनेशी दखल घेणे योग्य वाटले महानिर्मिती कंपनीत समूह समूहाने 2000 ते 2500 कर्मचारी खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात काम करीत असतात विविध वृत्तपत्राच्या माध्यमातून खापरखेडा येथील मुख्य अभियंताच्या बाबतीत बऱ्याच तक्रारी आलेल्या आहेत ज्यांची जाणीव कनिष्ठ कर्मचाऱ्या पासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आहे. त्यांच्यावर कुठलेही चौकशी विचारणा न झाल्यामुळे दिवसेनदिवस चुका करण्याची गती त्यांची जास्त जलद झाली आहे शेवटी त्यांच्या पाठीशी कोणपाठी राखणार आहे प्रशासनात आहे की राजकीय वर्तुळात आहे याबद्दल शंका निर्माण झाली आहे? याउलट देशभरात चालू असलेली परिस्थिती लक्षात घेता त्यांनी सर्वांसोबत कर्मचारी, अभियंता यांच्या मनात घर करून त्यांना दिलासा देऊन काम करावयास पाहिजे परंतु ते दिवसेंदिवस पोरकटपणा करत आहे त्यांचे उदाहरण म्हणजे कंत्राटी कामगार यांनी मास्क घेण्यासाठी एक हजार रुपये तिनी कंपनीत देण्यासाठी मुख्य कार्यालयाचे परिपत्रक असताना क्षेत्रीय कार्यालयानी त्याबद्दल परिपत्र काढायला नको तरीही ते स्वतः परिपत्रक काढतात की आम्ही एक 1000 रुपये देऊ नंतर परिपत्रक काढतात की कंत्राटी कामगारांच्या पगारातून कपात करू परत परिपत्रक मागे घेतात. वैद्यकीय अधिकाऱ्यावर दबाव आणतात कोणीही कर्मचारी दोन दिवस तीन दिवस सुट्टीवर असले की त्याला क्कांरटाईन च्या नावाखाली 14 दिवस क्कांरटाईन करतात. कुठलीही लक्षणे न आढळल्यास वैद्यकीय अधिकारी वरिष्ठांच्या दबावाखाली क्वांरटाईन करतात. परंतु जर एखादा जवळचा अभियंता असला तर तो पंधरा दिवस सुट्टीवर असला तरी कामावर रूजू करून घेतात. अशा अनेक तक्रारी मुख्य अभियंता यांच्या असल्यामुळे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात वातावरण दूषित झालेले आहे. नुकतेच मुख्य अभियंता यांनी अर्जित रजेच्या रोखीकरण्याच्या संदर्भात स्वतःच्या सही चे परिपत्रक काढले कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी यांचीसुद्धा काहीही गरज नव्हती आज सोशल मीडिया जलत झालेले आहे सर्व परिपत्रकाची कल्पना कर्मचाऱ्यांना असतेच उपरोक्त संदर्भीय परिपत्रक कुठलीही बाबीची त्याची पालन केले नाही संपूर्ण महानिर्मिती कंपनी फक्त खापरखेडा असे पावर स्टेशन आहे जिथे लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत 100% कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. ज्यामुळे शोशल डिस्टिंग चा फज्जा उडताना दिसून येतो नागपूर शहर हे रेड मध्ये आलेला आहे त्यामुळे कामठी, कन्हान, नागपूर येथील कर्मचारी, कंत्राटी कामगार कामावर यांचे येणे-जाणे असल्यामुळे तेथील अभियंता कामगार हा भयभीत झालेला आहे. बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक नुकसान होऊ नये परंतु गरज नसताना त्यांच्याकडून काम करून घेणे योग्य सुद्धा वाटत नाही.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात नागपूर, कामठी, कन्हान विविध गावातून महानिर्मितीचे अधिकारी-कर्मचारी येतात नागपूर जिल्हा रेड झोन मध्ये असूनही सुद्धा हे अधिकारी कर्मचारी यांना औष्णिक विद्युत केंद्रात प्रवेश कसा हा प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उदभवत आहे. औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा मुख्य अभियंता हे बाहेर गाऊन येणारे अभियंते, टेक्निशियन यांना खापरखेडा मध्ये राहण्याची सोय उपलब्ध का करून देत नाही. जर कोरोणा सारखा व्हायरस खापरखेडा मध्ये पसरला तर याला जबाबदार कोण असेल असा गंभीर प्रश्न जनतेसमोर व कर्मचा-या समोर पडलेला आहे. त्याचप्रमाणे 100% कंत्राटी कामगार एकाच वेळेस बोलावून त्यांच्याकडून संपूर्ण घाणीचे काम व विविध काम करून घेत आहे. त्यांना सकांळी 8 वाजतापासून ते सांयकाळी 4 वाजेपर्यत व 5:30 वाजेपर्यत बसवुन ठेवतात त्याचप्रमाणे आठ तासाची ड्युटी करण्यास भाग पाडत आहे तसेच त्यांना दमदाटी सुद्धा करत आहे केंद्रीय शासनाने तसेच महाराष्ट्र शासनाने एकीकडे जितकी कमी गर्दी करता येईल तितकी कमी गर्दी करावी परंतु खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात असे कुठेही करतानी दिसत नाही कंत्राटी कामगारांमध्ये सर्वच जण एकत्र येतात हस्तदोंलन करतात भेटीगाठी करतात सोशल डिस्टिंग कुठेही दिसून येत नाही कंत्राटी कामगार एकत्र बसतात जेवण करतात कोणतेही नियम पाळले जात नाही औष्णिक विद्युत केंद्रात फवारणी मशीन लावण्यात आलेली होती मात्र ती मशीन दोन दिवसातच पांढरा हत्ती झालेली दिसून येत आहे निकामी मशीन गेटच्या आतील भागात ठेवलेली आहे कंत्राटी कामगारांना आठ-नऊ तास औष्णिक विद्युत केंद्रात ठेवून काहीही तथ्य दिसून येत नाही कंत्राटी कामगारांना सकाळी लवकर बोलावून त्यांच्याकडून महत्वाचे काम घेऊन त्यांना लवकरात लवकर सुट्टी देऊन जितक्या लवकर गर्दी कमी करता येईल ते करण्यात यावी पाँवर प्लांट मध्ये गर्दी करु नये कंत्राटी कामगारांवर तेथील अभियंते, टेक्निशियन हे लोक भेदभाव करतात इथे येऊ नको, येथे बसू नको, साफ-सफाई कर आणि येथून निघून जा अशा पद्धतीची वागणूक साफसफाई कंत्राटी कामगारावर येथील अभियंते टेक्निशियन, तंत्रज्ञ अशा प्रकारची वागणूक करत आहे त्यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये नाराजीचा सुर निर्माण झालेला आहे अशा कंत्राटी कामगारांना चार तास किंवा काम झाले की त्यांना लवकरात लवकर पाँवर प्लांट मधून कसे लवकरात लवकर गर्दी कमी करता येईल व कंत्राटी कामगारांना बाहेर काढता येईल या उद्देशाकडे प्रशासनाला लक्ष देण्यांची गरज आहे.
विघुत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपाध्यक्ष जि. एन. सूपे यांनी निवेदनाव्दारे म्हटले आहे की , एवढीच अपेक्षा आहे की इतर मुख्य अभियंता प्रमाणे खापरखेडा मुख्य अभियंता यांनी वागावे जेणेकरून औद्योगिक शांतता कायम ठेवता.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …