Breaking News

*महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत आदिवासी समाजाला उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी* *अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग ची मागणी*

*महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत आदिवासी समाजाला उमेदवारी देऊन प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी*

*अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग ची मागणी*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

नागपुर:- निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील ९ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीला ५ आणि भारतीय जनता पक्षाला ४ जागा मिळू शकतात. आजवरचा इतिहास पाहिल्यास सर्वच राजकीय पक्षांनी आदिवासी उमेदवारांना विधान परिषदेत संधी दिली नाही, हा आदिवासी समाजावर एक प्रकारे घटनात्मक अन्याय आहे. महाराष्ट्र राज्य विधान सभेत आरक्षण मुळे २२ आमदार निवडून आलेले आहे मात्र विधान परिषदेत आदिवासींना प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणी ही प्रतिनिधी नाही यास्तव समाजातील ज्येष्ठ अभ्यासू नेते मधुकरराव पिचड, ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे, माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद नागपूर सुरेश कुंभरे, पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य, युवा नेतृत्व दिनेश शेराम यांना महाराष्ट्र राज्य विधान परिषद उमेदवारी देऊन किंवा राज्यपाल नामित विधान परिषद सदस्य म्हणून समावेश करण्यात यावा अशी मागणी निवेदन द्वारा शरद पवार, नितीन गडकरी, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली असे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,महाराष्ट्र सचिव,माजी उप महापौर कृष्णराव परतेकी, आदिवासी सेवक भिमराव पेंदाम, आदिवासी सेवक नामदेवराव पेंदाम, विवेक नागभिरे, स्वप्नील मसराम, शाम कार्लेकर, विजय परतेकी, शाम कूमरे, सुरेंद्र नैताम, दिवेश धुर्वे, नरेंद्र कोडापे, राहुल मरसकोल्हे, लीलाताई आत्राम, माधुरी ताई धूरवे, आदिवासी सेवक, जानकी ताई उईके, आदिवासी सेवक, निर्मला ताई कुमरे आदींनी कळविले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …