Breaking News

*धेय्यवेडे कोरोना वारीयर्सं* *ना नाव ना प्रसिद्धी फक्त सेवा* *सेवाकार्य व भोजनदान आपले कर्तव्य समझून दररोज शेकडोंना पुरवतात जेवण* *आम लंगर सेवा सैलानी बाबा दरबार चा सेवाभावी उपक्रम*

*धेय्यवेडे कोरोना वारीयर्सं*

*ना नाव ना प्रसिद्धी फक्त सेवा*

*सेवाकार्य व भोजनदान आपले कर्तव्य समझून दररोज शेकडोंना पुरवतात जेवण*


*आम लंगर सेवा सैलानी बाबा दरबार चा सेवाभावी उपक्रम*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसिया सावनेर*

*सावनेरः तालुक्यातील पाटनसावंगी शहरालागत असलेल्या सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या वास्तव्याने पावन झालेले तिर्थक्षेत्र म्हणून वाकी येथील “बाबा ताजुद्दीन” चा ताज दरबारात तसे तर सर्वच भाविकांच्या मनोकामना पुर्ण होताच यासोबतच येथे मनोरुग्ण व इतर कारणाने झपाटलेले ही बरे होतात आशी आख्यायिका आहे*


*त्यामुळे मनोरुग्ण व विविध व्याध्यांनी झपाटले असलेल्यांना त्यांचे आप्त परिवारातील लोक त्यांना या दरबारात आणून महिना गीनती सोडून देतात मग अश्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणार्या अनेक स्थानिक संस्था आहेत त्यातीलच एक संस्था म्हणजे “आम लंगर सेवा सैलानी बाबा दरबार वाकी*

 

*या सैलानी बाबा दरबार चे पुंडलिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर उमरेडकर,नेमाजी दांडेकर,विकेश सहारे,गुणवंता गावंडे,सुक्राम बागर्डे,अकीत गजभिये, हेमंत पाटील,अमोल सहारे आदी युवा मंडळी मागील चार पाच वर्षापासून बाबा ताज च्या ऊर्स दरम्यान भव्य आम लंगर सेवा तर देतातच सोबतच वर्षभर वाकी क्षेत्रात व परिसरात फीरणार्या मनोरुग्णाना जेवण आहे त्या ठिकाणी पुरवून मानवतेचा परिचय देत आहे*


*परंतू यावर्षी बाबा ताजुद्दीन यांचे वाकी येथील ऊर्स संपण्याआधिच देशात सर्वत्र कोरोना वायरस चा प्रादुर्भाव पसरु लागला व बधता बघता सर्व शासकीय प्रशासकीय व खाजगी कामे सोबतच व्यावसायिक प्रतीष्ठाने बंद पडू लागली व दिवसेंदिवस कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागला व काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल अश्या मनस्थितीत देशवासी होते परंतू तसे न होता लाँकडाऊन वरच्यावर वाढू लागले व याची मोठी झड बसली ती परप्रांतीय कामगारांना*


*काहीकाळ आपल्या कर्तव्य स्थानी राहून स्थिती सामान्य होण्याची वाट बघू त्यांचे धर्य आता उत्तर देऊ लागले ना हाताला काम,ना लक्ष देणारे मालक,ना ठेकेदार अयात आपल्या पोटाची खडगी व परिवाराची आठवण सतावू लागली बस,ट्रेन व खाजगी वाहने बंद असल्यामुळे आपल्या गंतव्यवर पोहचण्यासाठी पर्याय निवडला तो पायी जाण्याचा डोक्यावर व कडेवर आपल्या प्रपंचाचे ओझे घेऊन मार्गी निघनारे भुक व ताहणानी व्याकूळ या शेकडो कामगारांना तालुक्यातील दहेगाव ते केळवद या 30 कीलोमिटर च्या परिसरात मागील दिड महिन्यापासून त्यांच्या सायंकाळ च्या पोटभर जेवणाची व्यवस्था करण्याकरिता “सैलानी बाबा दरबार वाकी”चे सेवादार कोरोना वारीयर्सं यांनी पुढाकार घेतला व त्याकरिता विकेश सहारे यांचा तीनचाकी आटो व तीन चार युवक पुडंलीक मोरे यांच्या मार्गदर्शनात दररोज आपल्या सेवा देऊण मानुसकी जपत आहेत*


*आमचे स्थानिक प्रतिनिधींनी सैलानी दरबार परिसरात पोहचून त्यांच्या सेवाकार्याचे गुढ़ जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सदर सर्व सेवादार “कोरोना योध्दा हे युवा असुन त्यांच्या घरची परिस्थिती ही जेमतेमची दिसुन आली परंतू त्यांचे धेय्य व कार्य मोठ मोठ्यांना विचार करावयास लावणारे आहे व “मीळेल तर करारचं”असे नही तर “आम्हांला करायचंच” हा धेय्य आखुण त्यांची ही निरंतर सेवा अखंडपणे आजही सुरुच आहे.यांचे उत्साह वर्धन करण्याकरीता काही दानदाते ही आपल्या क्षमतेनुसार त्यांना मदत करत आहेत व हे धेय्यवेडे कोणत्याही प्रसिध्दीच्या प्रवाहात न येता आपले सेवाकार्य निरंतरपणे करत आहे हे विशेष*

*साध्या पणाचा संधिसाधू उचलताहेत लाभ*

*सेवाधर्म सर्वोपरी या बिदवाक्याला पुर्णत्वास नेणारी ही मंडळी स्वताच्या प्रसिध्दी पासुन खुप दुर आहे.याचाच लाभ उचलण्याकरिता काही संधिसाधू स्वनिर्मित समाजसेवी संस्था,रोटी बँक व स्वयंभू समाजसेवक यांच्या जवळील शिजवीलेले अन्न घेऊण स्वताः अन्नदान केलाचा वागवा फेसबुक व वाँटसप च्या माध्यमातून करत आहेत याचे या धेय्यवेड्यांना मुळीच सोयरे सुतक नाही परंतू “कोवीड़ 19” च्या प्रादुर्भावात ही संधिचे सोनं करु पाहणार्या संस्थांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले आत्मचिंतन करणे खरेच गरजेचे झाले आहे*


*या धेय्यवेड्यांना व त्यांच्या अखंड सेवा कार्यास महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फे मानाचा मुजरा*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …