सरकारच्या नियोजनाअभावी कापसाच्या शेतकरी विक्री पासून वंचित

48 तासाच्या आत संपूर्ण प्रायव्हेट किंवा सहकारी जिनिंग अंड प्रेसिंग मिल मध्ये फेडरेशन द्वारे कापूस खरेदी केंद्र चालू करावे अन्यथा शेतकऱ्यां सह आंदोलन –डॉक्टर राजेश ठाकरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष
रामटेक प्रतिनिधी-ललित कनोजे
रामटेक– एका बाजूला कोरोना शी लढा देण्याचे काम सरकारचे चालू आहे त्यासोबत शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाच्या खरेदीच्या वार्षिक नियोजना मध्ये सरकार द्वारे वेळेत लक्ष न टाकल्याने कापसाच्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे लॉक डाऊन मुळे देशभरातील स्पिनिंग मिल तसेच ऑइल मिल बंद असल्याने स्वार्थापोटी सर्व खाजगी जिनिंग व प्रेसिंग मिल धारकांनी कापसाची खरेदी बंद ठेवलेली आहे. आहे तसेच सहकारी जिनिंग मिल द्वारे फक्त एका शेतकऱ्याच्या पाठीमागे 40 क्विंटल कापूस बाजार समिती मार्फत ऑनलाइन नंबर लावून खरेदी करण्याची यंत्रणा राबवण्यात आलेली आहे त्यामुळे ऑनलाइन नंबर लावणाऱ्यां शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि खरेदी खरेदी करणाऱ्यां सहकारी जिनिंग अंड प्रेसिंग मिल ची संख्या बोटावर मोजण्याएवढे आहे त्यामुळे संपूर्ण कापूस खरेदी करण्याकरिता प्रत्येक तालुक्याला एक महिन्याचा अवधी लागण्याची संभावना आहे त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणावर जास्त उत्पादन करणारे कापसाचे शेतकरी कापूस खरेदी पासून वंचित सुद्धा राहणार आहे आणि ते कापसाच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक अशी व्यवस्था आहे त्यामुळे राज्यसरकारने या कापसाच्या उत्पादकांत करिता विशेष यंत्रणा राबवून संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस राज्य सरकारने आपल्या जबाबदारीवर फेडरेशनच्या मार्फत तसेच प्रायव्हेट जिनिंग प्रेसिंग धारकांच्या मार्फत तात्काळ विकत घेण्याची यंत्रणा चालू करावी याकरिता माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना डॉक्टर राजेश ठाकरे भाजपा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष यांनी मेल द्वारे निवेदन दिले आहे.

निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे मागण्या
1-ज्या प्रायव्हेट जिनिंग धारक यांनी सरकारी सबसिडीचा फायदा घेऊन उद्योग उभारले त्याच मील धारकांनी कापूस खरेदी करण्याकरिता हात वरती केलेली आहे असे जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या प्रायव्हेट जिनिंग अंड प्रेसिंग मिल धारकांकडून त्यांना दिलेली सबसिडी व्याजासकट वसूल करण्याचे आदेश द्यावेत .
2-संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांनी कापूस फेडरेशन प्रशासन व प्रायव्हेट जिनिंग-प्रेसिंग मिल धारकांची तात्काळ बैठक लावावी आणि त्यांची सुद्धा अडचण समजून घेऊन त्यावर तोडगा काढून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी फेडरेशन द्वारे प्रत्येक मिलमध्ये करण्यात यावे तसेच दुसरे खाजगी दलाल उद्योजक जर कापूस खरेदी करण्याकरिता तयार असतील तर फेडरेशन द्वारे त्यांनासुद्धा प्रायव्हेट मिल किंवा सहकारी मिल मध्ये योग्य दरात कापूस खरेदी करण्याची मुभा असावी जेणेकरून 7 दिवसाच्या आत मध्ये कापूस पूर्णपणे खरेदी केल्या जाईल त्यामुळे शेतकऱ्यांवरचा फार मोठा आघात दूर होईल
3- राज्य सरकार द्वारे फेडरेशनच्या हितार्थ तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ भविष्य करिता आतापासून नियोजन करून ठेवावेत जसे जेवढ्या जिनिंग अंड प्रेसिंग मिल आहेत तेवढ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कापसा करिता आवश्यक सुरक्षा व सुविधा देण्याकरिता आवश्यक शेड बांधकाम गोडाऊन तसेच सुरक्षेच्या हितार्थ इतर यंत्रसामग्री देण्यात यावी ज्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस सुद्धा खराब होणार नाही व फेडरेशन पक्का उत्पादन सुद्धा खराब होणार नाही
4- फेडरेशनच्या हलगर्जीपणामुळे सहकारी तत्त्वावर चालत असलेल्या जिनिंग अंड प्रेसिंग मिल येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलेल्या गाठी तसेच सरकी मोठ्या प्रमाणावर आवश्यक यंत्र सामग्री च्या अभावी खराब होत आहेत त्यामुळे आवश्यक यंत्रणा देण्यात यावी
5- राज्य सरकारने सहकारी जिनिंग अंड प्रेसिंग मिल यांच्या मिल परिसरातील संपूर्ण यंत्रसामुग्री व इतर यंत्रणेच्या वार्षिक ऑडीट करावे त्यामध्ये नियमाप्रमाणे काटेकोरपणे खरेदी-विक्री मालाचे जतन व सुरक्षा तसेच शेतकऱ्यांना बाजार समिती तसेच फेडरेशन चे माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा याचा प्रामुख्याने समावेश असावा
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे पारशिवनी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी कापसाचे उत्पादन घेत आहेत तसेच रामटेक चा काही भाग काही प्रमाणात कापसाचे उत्पादन घेत आहेत हे सर्व शेतकरी कापसाची खरेदी खोळंबल्या मुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेले आहेत कारण पारशिवनी तालुक्यात फक्त नरेंद्र जिनिंग मिल पारशिवनी या ठिकाणी कापसाची खरेदी चालू आहे त्यात ऑनलाइन नंबर लावा लागत असल्याने सोळाशे अधिक लोकांनी ऑनलाइन नंबर लावलेले आहेत त्यांची खरेदी करण्याकरता अजून एक महिन्याचा अवधी लागण्याची संभावना आहे इतर प्रायव्हेट जिनिंग अंड प्रेसिंग मिल मधील खरेदी बंद आहेत त्यामुळे जर कापसाची खरेदी या सात दिवसात जर नाही झाली तर शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान होण्याची संभावना आहे . सात दिवसात जर खरेदी केंद्र चालू झाली नाहीत तर वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला आग लागण्याची संभावना आहे तसेच कीड सुद्धा स्टोअर करून ठेवलेल्या कापसामध्ये लागण्याची संभावना असल्याने घरात तसेच गावात रोगराई पसरण्याची सुद्धा संभावना असते .
त्यामुळे लवकरात लवकर जास्तीत जास्त ठिकाणी खरेदी केंद्र चालू करून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे निवेदनाच्या शिष्टमंडळात डॉक्टर प्रमोद भड संचालक नरेंद्र जिनिंग व प्रेसिंग मिल तसेच नगरसेवक तथा सत्ता पक्ष नेता सागर सायरे तसेच कापूस उत्पादक शेतकरी हे निवेदक म्हणून होते
Maharashtra News Media सच की आवाज