*भावानेच भावाला पोहचविले यमसदनी*
*भावा ची हत्या करुण त्याले अपघात झाले असे दाबण्याचा प्रयत्न*
*सावनेर पो.स्टे अंतर्गत हेटी गावातील घटना
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया*
*सावनेर:- सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या 4 किमी अंतरावर हेटी(सू) शिवारात जिंतेंद्र रामचंद्र उईके वय 27 रा.हेटी(सु) हा युवक आपल्या बहिणी व वडीला सोबत राहत होता. काही दिवसा पासून तो चिंतेत असायचा अश्यातच त्यांनी 6 मे कल सकाळी घरी काही श सांगता निघून गेला दिवस भर तो कुठे आहे याचा काही पत्ताही लागला नाही.*
*रात्री 9-00च्या दरम्यान तो दारू पिऊन घरी आला व त्याच्याच भावासोबत शाब्दिक वाद विवाद झाल्या चे सांगण्यात येत आहे काही वेळात तो रागारागाने घरा बाहेर निघाला असेही बोलल जात होते.व अश्यातच घरा जवळ च्या सिमेंट च्या फरशी वर तो पडलेल्या अवस्थेत दिसला रक्त पाहून नागरिकाने सावनेर पोलिसांना सूचना दिली..पोलिसांनी घटने चा पंचनामा केला व मृतकाला शवविच्छेदन करिता रवाना केले*
*सदर हत्तेची घटना घडल्यानंतर आरोपीने बनवाबनवी करुण घटनेला अकस्मात पडून भावाचा मु्त्यू झाल्याचे निदर्शनास आणन्याचे प्रयत्न केले व त्याच्या या कार्यात त्याच्या परिवारानेही साथ दिल्याचे सुत्र आहे.रात्रीला घडलेल्या या दुर्दैवी प्रकाराच्या चर्चा रंगू लागल्या व सदर घटनेत काहीतरी घातपात आसल्याचा संशय निर्माण होऊ लागला असता सावनेर पो.स्टे.चे पोलि निरिक्षक अशोक कोळी यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन हकीकत जाणून घेतली*
*यादरम्यान परिवाराला पोलिसांनी विचारपूस केली.. असता त्यांच्या कडून मीळत असलेल्या विसंगती पुर्वक माहितीच्या आधारे सदर घटना ही हत्ये ची असू शकते असे निदर्शनास येऊ लागले असता पोलिसांनी विचारपूस व शवविच्छेदन व इतर पुढील कारवाई करण्या करण्यात मृंतकाच्या लहान भाऊ नरेंश उईके यास सोबत घेऊण आले व ठाण्यात त्यालाही सदर घटनेसंबधी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे ठाणेदार कोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी आरोपीँआ आपल्या पोलीसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटा सारखा बोलू लागला व त्याचेच आपल्या भावाची हत्या केल्या चे कबूल केले.*
*सावनेर पोलिसांनी आरोपीवर 302 कंलम लागू करून त्या वंर गुन्हा नोंदवला.सदर हत्तेचे मुळ कारण काय हे निश्पन्नास आणन्याकरिता पुढील तपास सावनेर पोलीस करत आहे