Breaking News

*बुध्द पोर्णिमा उत्साहात साजरी* *बुध्द विहारात “मान्यवरांच्या उपस्थितीत बुध्द वंदना*

*बुध्द पोर्णिमा उत्साहात साजरी*


*बुध्द विहारात “मान्यवरांच्या उपस्थितीत बुध्द वंदना*


*प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया सावनेर*


*कोवीड़ 19 “कोरोना वारियर्स”पत्रकार,सोशल मीडिया प्रतिनिधी, सफाई कामगार व विध्यूत कर्मचाऱ्यांचा स्टाँल,अंगवस्त्र व पुष्प देऊन समाज सेवी अमित झोडापे यांनी केला सन्मान*

*सावनेरशहरातील आंबेडकर वार्ड क्र.11 येथील बुद्ध विहारात प्रभागातील नगरसेविका इंदिरा झोडापे यांच्या पुढाकाराने प्रभागातील बुध्द विहारात सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तेजसींग सावजी यांच्या हस्ते पत्रकार संघाचे पदाधिकारी किशोर ढुंढेले, योगेश पाटील, विजय पांडे,मनोहर घोडसे,पीयूष झिंजुवाडीया,सुरज सेलकर,दिनेश चौरसीया आदिंच्या प्रमुख उपस्थितीत प.पू.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पितकरून मानवंदना देऊन प्रभागातील बुध्द विहारात तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतीमेचे विधिवत पुजन करुण बुध्द वंदना करुण अत्यंत साध्या रुपात परंतू उत्साहात बुद्ध पोर्णीमा साजरी करण्यात आली*

*कोरोना वारियर्स चा सन्मान*

*याप्रसंगी कोरोना विषाणूंचा वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेत असलेल्या पत्रकार व सोशल मीडिया प्रतिनिधी यांचे पुष्प व अंगवस्त्र देऊण सन्मान समाज सेवी अमित झोडापे यांनी सन्मान करुण मानवतेचा परिचय देत सोबतच या कठीण परिस्थितीत ही आपल्या जिवीतेची परवा नकरता नियमित आपल्या कर्तव्यावर कार्य करणारे नगर पालीकेच्या सर्व सफाई कामगार तसेच महाराष्ट्र राज्य विध्यूत वितरण कंपनी चे सर्व कामगारांना अंगवस्त्र व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले तर पोलीस अधिकारी निशांत जुनोनकर,सतीष पाटील यांनाही सन्मानीत करण्यात आले*


*याप्रसंगी विजय थुल,बबन ढोके,सचिन सोनटक्के, पंकज थुल,शारदा थुल, अंकीत सहारे,रेखा थुल, मंगल ढोके,सौ.फालेताई,सौ.सहारे ताई इत्यादी प्रामुख्याने उपस्थीत होत्या*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …