*सावनेर प्राथमिक आरोग्य केन्द्राला आरोग्य पीपीई किट भेट*

*सेन्ट्रल बायोटेक प्रा.ली.व मित्र परिवाराचा उपक्रम*
*प्रतिनिधी सुरज -सेलकर सावनेर*
*सावनेर : सावनेर येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रावर सकाळ पासुनच रुग्णांची गर्दी असते अश्यावेळी उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना संरक्षित करण्याकरिता आज सेंट्रल बायोटेक प्रा. लिमि. व त्यांच्या मित्र परिवारा कडून सावनेर प्राथमिक आरोग्य केन्द्राला ९ पीपीई किट भेट स्वरूप देण्यात आल्या.*
*यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.भूषण सेम्बेकर, डॉ. सदीप गुजर, वैद्यकीय अधिकारी डॉ शिवानी छेनिया, सहाय्यक अधिसेविका, सुनीता येटे, घनश्याम तुर्के यांनी या किट स्वीकारल्या.*
*याप्रंसंगी सेंट्रल बायोटेक चे संचालक प्रशांत रासेकर, अण्णा रासेकर, चंद्रशेखर धवड, महाजन, जिल्हापरिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिति उपसभापति प्रकाश पराते, नगरसेवक नीलेश पटे, माजी नगरसेवक तेजसिंग सावजी, माजी न प उपाध्यक्ष लक्ष्मीकांत दिवटे, व्यापारी संघ सचिव मनोज बसवार, विजय पांडे, चंदू कामदार, अश्विन कारोकार, विकास गुप्ता उपस्थित होते.*
Maharashtra News Media सच की आवाज