Breaking News

मौदा तालुक्यात जेसीबी व 6 ट्रँक्टर जप्त अवैद्य रेती उत्खनन सुरूच

मौदा तालुक्यात जेसीबी व 6 ट्रँक्टर जप्त

अवैद्य रेती उत्खनन सुरूच

खात प्रतिनिधी-तुषार कुंजेकर

खात : लॉकडाऊनमुळे बहुतेक सर्व व्यवसाय ठप्प आहेत. मात्र अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्यांचे काळे धंदे अद्यापही सुरूच आहेत.
        मौदा तालुक्यातील मुरमाडी शिवारातील सुर नदीचे उपनदी (नाला) मध्ये अवैद्य रेती उत्खनन करतांना अरोली पोलिसांनी एक जेसीबी मशीन व 6 ट्रँक्टर – ट्रॉली जप्त केले. त्यातील एका ट्रँक्टर – ट्रॉलीमध्ये 1 ब्रास रेती होती. घटनास्थळावर 8 व्यक्ती मिळून आले व काही ट्रँक्टर – ट्राली चालक घटनास्थळावरून पळून गेले. सदर कारवाई एका खबरीद्वारा माहीती मिळाल्यामुळे अरोली पोलिसांनी पहाटे 1.30 ते 2.15 वाजता दरम्यान केली. छापा कारवाईत अरोलीचे ठाणेदार विवेक सोनवाने, हेड कॉस्टेबल भगवान चांदेवार, शिपाई सतिश मोटघरे, रमेश नाईक व चालक पोलिस नायक गातेश बांते सामील होते. सदर प्रकरण कारवाईस्तव तहसिलदार मौदा यांचेकडे पाठविण्यात आले आहे.

अरोली पोलिस देतात अर्धवट माहीती.
अरोली पोलिसांकडून याबाबत प्रेसनोट देण्यात आली. मात्र त्यामध्ये एकाही ट्रँक्टरचा क्रमांक नमुद नव्हता. त्याचप्रमाणे जेसीबी मशीन कोणाची आहे. ट्रँक्टर चालक – मालकांचे नांव काय आहे, याबाबत काहीच खुलासा करण्यात आला नव्हता. ठाणेदार विवेक सोनवाने यांना फोन करून विचारले असता, चार ट्रँक्टरला नंबर नसल्याचे सांगीतले. रेती चोरी करणारे भंडारा जिल्ह्यातील पांढराबोडी गावाचे रहिवासी असल्याचे त्यांनी सांगीतले. दोन ट्रँक्टर विश्वनाथ कुकडे यांचे मालकीचे तर प्रत्येकी एक ट्रँक्टर शत्रृघ्न वैद्य, राजकुमार मोहतुरे यांचे असल्याचे व जेसीबी मशीनचा मालक गुजरातचा असून विश्वनाथ कुकडे यांनी सदर मशीन भाड्याने आणल्याचे माहीती त्यांचेकडून प्राप्त झाली.

नेहमी होते अवैद्य उत्खनन
       अरोली पोलिस स्टेशन हद्दीतील सुर नदी रेती चोरट्यांकरीता एकप्रकारे सोन्याची खानच आहे. येथून नेहमी अवैद्य रेती उत्खनन होत असते. मात्र अरोली पोलिस कारवाईचे नावाखाली काही मोजक्या प्रमाणात जप्तीची कारवाई करीत असते. हि कारवाई सुद्धा खबऱ्याकडून माहीती मिळाल्यामुळे झाली. मात्र मोठ्या प्रमाणात होणारे रेतीचे उत्खननाबाबत अरोली पोलिसांना माहीती नसावी याबाबत जनतेमध्ये आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. अरोली पोलीसांचे आशीर्वादाने हा सर्व प्रकार चालत असल्याची परिसरात चर्चा आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …