बापरे…! बाबुल चा डब्बा चक्क 2000 रुपये आणी तंबाखू पुडी 30/ 40 रूपये

बापरे…! बाबुल चा डब्बा चक्क 2000 रुपये आणी तंबाखू पुडी 30/ 40 रूपये

कोरपना प्रतिनिधी-गौतम धोटे

कोरपना :- कोरोना महामारिच्या प्रकोप अख्या जगात दिवसेंदिवस वाढतच आहे त्यातच केद्रशसित प्रदेशातील एकुण 28 राज्यातील सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान सहित तंबाखू. सुपारी. आणी पान मसाला सेवन करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन तुकने बंधनकारक आहे .खरतर खर्रा म्हटलं की अनेकांचा तोंडाला पाणी सुटते.  खर्रा हा अनेकांचा जीवनातला आवश्यक घटक झाला आहे. कोरोणामुळे सर्वत्र लॉक डाउन असल्याने खर्रा चे सामान मिळेनासे झाले आहे. त्यामुळे खर्रा चे मिळत असलेल्या मिश्रणात महत्वाचा घटक असलेल्या बाबुलचे भाव मात्र गगनाला भिडले असल्याचे निदर्शनास येत आहे.

लॉक डाऊन मध्ये अनेकांचे खर्रा चे वांदे झाले आहेत. खर्रा साठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. तर अनेक जण आपल्या घरीच तयार करीत असून आपला तलप भागवत आहेत. छोटे व्यावसायिक यांचे सामान संपत आले असून आता ते सामान कुठे भेटणार याचा शोध घेत आहे. काही मोठ्या डीलर नी  खर्रा चे सामान स्टॉक करून ठेवल्याने तो माल आता दामदूपटीने, बेभावाने विकत असल्याचे दिसून येत आहे. बाबुल चा 100 ग्रामचा डब्बा 2000 रुपये तर त्यासोबत लागणारी सुपारी ही दुपटीने म्हणजे 1kg सुपारी 800 रुपयाला विकत आहे.

यामुळे छोते व्यावसायीक हे कसे बसे आपला धंदा कायम रहावा यासाठी खार्रा विकत होते. त्यांना आता अवाढव्य भावाने या सामानाची खरेदी करावी लागत असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे तर दुसरी कडे मोठे डीलर ज्यांचा कडे स्टॉक माल साठवून ठेवलेला आहे. ते या लॉक डाऊन चा फायदा घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

खर्रा झाला 40 रुपये
कोरोना वायरस मुळे सर्वत्र बंद पाडण्यात येत आहे. यामुळे सर्वत्र भाव वधारल्याचे दिसून येत आहे. त्यात जीवनातील एक अंग बनलेला खर्रा चा भावातही दुपटीने वाढ झाली असून दहा, वीस रुपयास मिळणारा खर्रा आता 40 रुपये झाला आहे. असे असले तरी काही शौकीन नागरीक पैसे कितीही गेले तरी चालेल पण खरा पाहिजे या तत्त्वावर खरा विक्री सुरू आहे.

तंबाखू पुडी 30/40 रुपये

ग्रामीण भागात तंबाखू शौकीन सुध्दा मोठ्या प्रमाणावर आहे. तंबाखू पुडी 5 रुपयाला विकली जात होती. मात्र आता या लॉकडाऊन मध्ये चक्क 30/40 रुपये होवून देखील मिळत नसल्याने शौकीनामध्ये खदखद व्यक्त केली जात आहे.

 राज्यात तंबाखू जन्य पदार्थाची विक्री बंदी आहेत. तरी देखील मोठ्या प्रमाणावर तंबाखू, आम्ल जन्य पदार्थ विकल्या जाते. यावर कुणाचे नियंत्रण नाही का..? की फक्त कागदोपत्री, नावापुरती बंदी! 

छोटे व्यवसायिक, पानटपरीवाले दुसऱ्या कडून (डीलर) विकत घेऊन आपला व्यवसाय चालवितात. यांच्यावर घरात घुसून कार्यवाही केल्या जाते मात्र मोठे डीलर अपवाद असून ते खुलेआम विक्री करताना देखील त्यांचा वर कसल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नसल्याने अधिकारी यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …