चंद्रपूर शहरात पुन्हा एक कोरोना पॉझेटिव्ह अहवाल प्रशासनाचा प्रलंबित च
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे कोरपना
चंद्रपूर : प्रशासकीय मात्र अहवाल प्रलंबित च .शहरात पहिला रुग्ण 2 मे रोजी सापडला होता तो एकमेव कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण वाढल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले होते त्यात प्रशासनाने सर्वप्रकारे खबरदारी घेत उपाय योजना तात्काळ केल्या व त्या पॉझेटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब नमुने तपासण्यास पाठविले असता सर्वांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आले. तेव्हा चांद्रपूरकरांनी सुटकेचा श्वास घेतलाच होता पण पुन्हा एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण शहरात असल्याची बातमी कानावर येताच सर्वाना पुन्हा सतर्कतेचा इशारा मिळाला आहे.
एका युवतीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. चंद्रपूर शहरात यवतमाळ येथून एक तरुणी आली होती. या तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर शहरातील बिनबा गेट परिसरामध्ये तातडीनं प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू करण्यात आले आहे.
ही तरुणी तिच्या आईवर सुरू असलेल्या उपचारांमुळे यवतमाळला गेली होती. 9 मे रोजी ही तरुणी आई-भावासह चंद्रपुरात परतली होती. 11 मे रोजी या युवतीचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. चाचणीच्या अहवालामध्ये या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. या तरुणीच्या आई आणि भावाचेही स्वॅब म्हणजेच घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले असून या दोघांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.तरीही घरिच रहा .सुरक्षित रहा ..
Maharashtra News Media सच की आवाज