*खाजगी व्यापाऱ्यांना कापुस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्वींटल 1500 रू. बोनस जाहीर करा*
*पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर*
कोरपना प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना– चंद्रपूर, यवतमाळ व विदर्भातील अन्य जिल्ह्यात कापूस खरेदीत फेडरेशन व सीसीआय चे खरेदी करीता राज्य सरकारचे व्यवस्थापन अपयशी ठरले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना कापूस खाजगी व्यापार्यांना विकावा लागला व त्या सर्व शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 1500 ते 2000 रु. कमी दर मिळाला. याची नोंद तिथे जिनिंगला आहे तरी त्या नोंदी प्रमाणे राज्य सरकारने आपले नियोजनात आलेले अपयश मान्य करुन अशा मजबुरीने कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना 1500 रु. प्रति क्विंटल बोनस जाहीर करावा. मुख्यमंत्री असतांना देवेंद्र फडणवीस सरकारने चना खरेदी गोडाऊन अभावी होऊ शकली नव्हती तेव्हा 1000 रु प्रति क्विंटल बोनस दिला होता.
कापूस उत्पादकांचे झालेले नुकसान बोनस देऊन भरून काढावे या शेतकऱ्यांनी लॉकडाऊन काळात प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांचे आदेशाचे पालन करून दीड महिना कापूस आपल्या राहत्या घरात खोलीत ठेवला, आता फेडरेशन आणि सीसीआय ची खरेदी सुरू झाली तेव्हा कापूस बाजारात घेऊन गेल्यावर त्यांची खरेदी नियोजनाअभावी फेडरेशन व सीसीआय ने केली नसल्याने कमी दरात खाजगी मध्ये कापूस विकावा लागला ही राज्य सरकार ची चूक आम्ही मानतो म्हणून 1500 रु प्रति क्विंटल बोनस खाजगी व्यापाऱ्यांना विकणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.