*धापेवाड्या च्या महालक्ष्मी कापूस जीनला आग लाखोचे नुकसान* *जळीत घटना किंतु परंतू च्या फेर्यात*

*धापेवाड्या च्या महालक्ष्मी कापूस जीनला आग लाखोचे नुकसान*

*जळीत घटना किंतु परंतू च्या फेर्यात*

*विशेष प्रतिनिधी मोहपा*
*कळमेश्वर तालुक्यातील कळमेश्वर सावनेर रोडवर असलेल्या धापेवाडा येथील महालक्ष्मी कापूस जीनला आज दुपारी साडेचार वाजता दरम्यान अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्या.*
*सदरची आग जिनिंग च्या बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक डीपी वर माकड कुदल्याने झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलल्या जात असून जिन मध्ये असलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या मदतीने आग वीजवण्यास मदत करण्यात आली.आग विझवण्यासाठी सावनेर इथून अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले होते आग विझवताना हवे मुळेही अग्निशमन दलास मोठी मशागत करावी लागली.*
*आग लागली त्या वेळेला तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचा कापूस याठिकाणी विक्रीसाठी आणल्या गेला होता सुदैवाने विक्रीला आलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला धोका निर्माण झाला नाही तसेच अचानक लागलेल्या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचा कापूस आणि गाठी जळून खाक झाल्या सावनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदर जिनिंग येत असल्याने सावनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना घटनेची माहिती मीळताच त्यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रण आणण्यास मदत केली.*
*सदर घटना ही शार्ट सर्किट मुळे झाल्याचे बोलल्या जात असले तरी घटनास्थळी उपस्थितांच्या किंति परंतू चर्चा रंगत असल्याने सदरहू घटनेतील सत्यता तपासा अंती निष्पन्नास येईलच की खरंच आग शार्ट सर्किटमुळेच झाली की यात दुसरे ही काही कारण आहे*
*सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी अधिकारी घटनेचा तपास करत*

*जळीत प्रकरणातील सत्यता शोधून काढू*

*सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी पोहचून प्रथम आगीवर नियंत्रण मीळवून मोठी दुर्घटना अथवा नुकसान होण्यापासून संरक्षण तर केलेच सोबतच घटनेतील सत्यता तपासातून निष्पन्नास येईलच याची खात्री आमच्या प्रतिनिधींस दीली*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …