*रब्बी हंगामातील धान्य खरेदीचे सिरोंचात शुभारंभ* आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी फित कापून व धानाचे वजन काटा करून केले प्रारंभ *रब्बी हंगामातील धान्य खरेदीचे अन्य केंद्रे तात्काळ सुरू करण्याचे दिले निर्देश*

*रब्बी हंगामातील धान्य खरेदीचे सिरोंचात शुभारंभ*
आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी फित कापून व धानाचे वजन काटा करून केले प्रारंभ

 

*रब्बी हंगामातील धान्य खरेदीचे अन्य केंद्रे तात्काळ सुरू करण्याचे दिले निर्देश*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

*सिरोंचा*:- माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सोमवार 11 मे रोजी रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्राचे फित कापून व धानाचे वजन काटा करून आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत खरेदी केंद्राचे शुभारंभ केले.
सिरोंचा तालुक्यात धान हे प्रमुख पीक असल्याने खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात धानाचे उत्पादन घेतले जाते. लॉकडाऊन व संचार बंदीमुळे यंदा धान खरेदी केंद्राला उशीर झाले शेतकऱ्यांची गैरसोयी होऊ नये याकरिता आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्वतः पुढाकार घेऊन व शासन दरबारी पाठपुरावा करून धान्य खरेदी केंद्रास खुले केले.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी विधिवत पूजन करून नारळ फोडले. पहिल्याच दिवशी असंख्य शेतकऱ्यांनी धान्य खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात आणले.
तालुक्यातील अंकीसा, जाफराबाद, वडदम(रंगधामपेठा), अमरावती, बामणी, पेंटींपाका आदी धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकाना दिले असल्याचे व अन्य केंद्रेही तात्काळ खरेदीसाठी उपलब्ध होणार असल्याचेही आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले.
सिरोंचा येथील धान्य खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केले असून लॉक डाऊन असले तरी फिजिकल डिस्टनसिंग ठेऊन व योग्य ती काळजी घेऊन धान्य विक्री करणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखविले.
धान्य खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी सिरोंचा पंचायत समितीचे उपसभापती रिक्कुला क्रीष्णमुर्ती, नगर सेवक रवी रालबंडीवार, नागेश्वर गागापूरवार, मधुकर कल्लूरी उपस्थित होते.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …