मौदा न.प.मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करा…
नगरसेविका प्रियंका काळमेघ यांची मागणी..
पत्रकार संघाने दिले निवेदन…
मौदा प्रतिनिधी -तुषार कुंजेकर
खात : मौदा नगरपंचायतला नवीन मुख्याधिकारी याच महिन्यात ५ तारखेला रुजू झाल्या. परंतु १० दिवस होऊनही त्यांच्या जवळ जिल्हाधिकारी यांनी ३ तारखेला काढलेला पत्र नाही. उलट लोकांना हे पत्र मागत आहेत अश्या मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी असे मत मौदा न.प. नगरसेविका प्रियंका काळमेघ यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
लॉकडाऊन ३.० सुरू झाल्यापासून शासनाकडून काही अंशी शिथिलता देण्यात आल्या होत्या व त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तसा आदेशही दी. ३.०५.२०२० रोजी देण्यात आला असून त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील कन्हान कन्टेन्मेंत झोन वगळता इतर सर्व भाग ऑरेंज झोन घोषित करण्यात आला आहे व त्यानुसार एकल दुकाने, तसेच वसाहतीतील दुकाने, एका लेन मधील सलग ५ दुकाने कोणत्याही जीवनावश्यक व जीवनावश्यक अटी सह सुरू करण्याची परवानगी देत आहे तेव्हा सदर आदेशास अनुसरून काही दुकानदारांनी दुकाने उघडण्याबाबत मुख्याधिकारी न. प. मौदा ह्यांना मागणी केली असता त्यांच्या मार्फत आमच्या कडे कुठलाही आदेश ह्याबाबत प्राप्त झाला नाही तेव्हा नागरिक/ दुकानदाराकडे असा आदेश असल्यास आपण आम्हाला द्या अशी मागणी केली जाते ही नगरंचायतीच्या कर्यालाची कार्यतत्परता दर्शवते.
नगरसेवकांनी सदर बाबींच्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी ह्यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी माझ्या कडे २००-३०० नागरिकांचे अर्ज दुकाने उघडण्याचा परवानगी साठी प्राप्त झाले असून मला नागरिक भेटतील व त्यानुसार मी एक एक नागरिकास परवानगी देण्यावर निर्णय घेईल असे सांगितले.
परंतु जिल्हाधिकारी ह्यांचे कार्यालयीन आदेश नुसार सदर आदेशात परवानगी देण्यात आलेल्या कोणत्याही इतर परवानगीची आवश्यकता नसल्याचेही नमूद आहे.
तेव्हा मुख्याधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात संबंधित आदेश लावूनही नागरिकांनाच आदेशाची मागणी करत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची हेळसांड करताना निदर्शनात येते. सध्या ग्रामीण भागातील शेतकरी हे कृषी कर्ज, कृषी कामांसाठी शहरात येत असून त्यानं दुकाने बंद असल्याने मानसिक तणाव होत आहे. तेव्हा शासनाने सदर मुख्याधिकारी वर कार्यवाही करावी. असे नगरसेविका प्रियंका काळमेघ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
मौदा तालुका पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन…
मुख्याधिकारी यांनी माझ्या परवानगी शिवाय दुकाने सुरू करू नये अन्यथा दंड आकारण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांची कामे थांबली. ह्या आशयाचे निवेदन मौदा येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर व तहसीलदार प्रशांत सांगडे यांना देण्यात आले. यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम डोरले, कार्याध्यक्ष संजय गिरडे, उपाध्यक्ष कैलास बनकर, कोषाध्यक्ष रघुनाथ शहारे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दयालनाथ नानवटकर, प्रा. शैलेश रोशनखेडे ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा सरचिटणीस चक्र धर गभने अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ मौदा तालुका उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज