Breaking News

*अवैध मोहफुल दारू विक्रेत्यास अटक*

*अवैध मोहफुल दारू विक्रेत्यास अटक*

सावंगा प्रतिनिधी- अनिल बालपांडे 
*लोहारी सावंगा, पोलिस स्टेशन जलालखेडा अंतर्गत येणाऱ्या लोहारी सावंगा चौकी मधील खापा (घु) येथील स्थानिक रहिवासी पिंटू उर्फ मुकेश दयाराम घागरे वय 40 वर्ष हा लोहारी सावंगा ते भारसिंगी सार्वजनिक रोड व अवेध रित्या मोहफुलांची गावठी दारू विकत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सहायक फौजदार अनिल जोशी पोलीस शिपाई अरविद जाधव यांनी साफळा रचुन पिंटू घागरे याला रंगेहाथ पकडले त्याच्या जवळ 20 लिटर मोहफुल गावठी दारू किंमत 4000 रु, चा माल जप्त करण्यात आला त्याच्या विरुद्ध कलम 65 ई, मुंबई दारुबंदी कायदा 188,269,270 भा द वि सहकलम कोविड 19 नियम 11 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 साथरोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 3 अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …