*पतंजलि काढ्याचे दररोज 100 पाकीट नियमित वितरण* *नागपूर पतंजलिचे योगयोध्दांचा सुप्त उपक्रम*

*पतंजलि काढ्याचे दररोज 100 पाकीट नियमित वितरण*

*नागपूर पतंजलिचे योगयोध्दांचा सुप्त उपक्रम*

*जिल्हा प्रतिनिधी नागपूर*

*नागपूरसंपुर्ण विश्वाला नोवल कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे.या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अद्यापही वँक्सीन उपलब्ध नाही या संसर्गजन्य विषाणू पासुन स्वताःचे व परिवाराचे रक्षण करावयाचे असल्यास प्रत्येकास आपले ईम्यूनीटी पावर (रोग प्रतिकारक शक्ती) वाढविने गरजेचे आहे*


*याकरिता योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या व आयुष्य मंत्रालयाने राष्ट्रीय वनस्पती घोषित केलेल्या गुडवेल अथवा गीलोय,अश्वगंधा,हळद,तुळस,आलं,काळे मीरे व कलमी इत्यादींचे योगतज्ञ ज्योत्सना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज शंभर पाकीटे तयार करुण नागपूर शहरातील आकाश नगर, लवकुश नगर , महाकाली नगर इत्यादी नगरातील जे सेवाधारी आहेत,जे या कोरोनाच्या संकट काळात घराच्या बाहेर येवून मदद करतात ,कुठेना कुठे सेवा देतात अशा लोकाना पतंजलि गिलोय काढ्याचे 100 पॅकेट तयार करून त्याचे वाटप केले जात आहे.जेणेकरून त्यांचा इम्यूनिटी पावर वाढुन त्यांना कोणत्याही विषाणुचा प्रादुर्भाव होणार नाही सोबतच योगप्राणायाम करायला सुध्दा सांगितले.हा काढा आपल्या शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवीण्या करिता अतिशय उपयुक्त आहे. तसेच या संकटाच्या वेळी सदर काढा निशुल्क वितरण करणे म्हणजे एक प्रकारे कोरोना वारियर्स यांची सेवा करने होय. गिलोय ही वनस्पती राष्ट्रीय वनस्पती म्हणून आयुष मंत्रालयाने घोषित केलेले आहे गिलोय काढ़ा घेतल्याने रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते, ताप येत नाही, पाचन शक्ति वाढते ,अस्थमा ,गाठीचा आजार बरा होतो मधुमेह संतुलित होतो. गिलोय यालाच गुड़वेल असे सूध्दा म्हटल्या जाते*
*या कठीण समयी समाजाला आपलं ही काही देणं लागते हा विचार मनात घेऊण ज्योत्सना इंगळे व त्याच्या परिवारासह सदर उपक्रमात विजया लांडे, समीर काळे ,माधूरी निंबुरकर ,दुर्गा डुंबरे आणि सुरेखा नवघरे इत्यादी सहकार्य करत आहेत*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …